शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत नाही; बापटांनी सांगितला 'त्यांच्या' मनातला निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 13:30 IST

सर्वोच्च न्यायालय शिंदे गटला दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी वेळ देऊ शकते का? सत्तासंघर्षावरील तुमच्या आमच्या मनाला सतावणारे अनेक प्रश्न, त्यांची उल्हास बापट यांनी दिलेली उत्तरे...

१६ आमदार अपात्र ठरले तरी शिंदे गट-भाजपाच्या सरकारला धोका नाही असे शिंदे गट, भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार देखील सांगत आहेत. परंतू घटनातज्ञ उल्हास बापट यांनी त्यांच्या मते निकाल काय असेल, हे सांगितले आहे. यामध्ये त्यांनी 16 आमदार अपात्र ठरले तर कोणालाच बहुमत मिळणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच पुढे राज्यात काय होईल याचेही भाकीत केले आहे. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: ...तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील; उल्हास बापटांचे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी महत्वाचे विधान

लोकमत व्हिडीओचे संपादक आशिष जाधव यांनी लोकमत डॉट कॉमवर ज्येष्ठ विधिज्ञ उल्हास बापट यांची मुलाखत घेतली. यावेळी बापट यांनी काही शक्यता वर्तविल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत्या दोन-तीन दिवसांत येण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तविली आहे. 

समजा न्यायालयाने पक्षांतर बंदी कायदा लागू होतोय, परंतू तुमच्याकडे ४० आमदार आहेत मग एक ठराविक कालावधी देऊन तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सर्वोच्च न्यायालय म्हणू शकते का, या सवालावर याला डॉक्टीन ऑफ सायलेन्सेस असे आम्ही म्हणतो. १० व्या कलमानुसार तुम्ही पक्षाच्या विरोधात मतदान करणार असाल तर आधी पक्षाची परवानगी काढा किंवा पुढच्या १५ दिवसांत पक्षाने तुम्हाला माफ करायला हवे. इथे आता १० महिने झाले आहेत. यामुळे असा अर्थ घटनेचा लावता येणार नाही, असे बापट म्हणाले. सर्वोच्च न्यायालय आता तुम्ही दुसऱ्या पक्षात जा असे सांगण्याची सुतराम शक्यता नाही, असे बापट यांनी स्पष्ट केले. 

Uddhav Thackeray vs Eknath Shinde: १६ आमदार अपात्र झाले तर उरलेल्या २४ जणांचे काय? उल्हास बापटांनी 'कायद्याचे राजकारण' सांगितले...

सर्वोच्च न्यायालय तुमच्या मते काय निकाल देईल, असा सवाल विचारला असता बापट यांनी गेल्या १० वर्षांपासून मी जे अंदाज व्यक्त केले ते बरोबर आले आहेत. ईडब्लूएसचा एक अपवाद वगळता सर्व माझे निष्कर्ष बरोबर ठरले आहेत. दोन तृतियांश  लोक बाहेर पडले तर ते एकाचवेळी बाहेर पडायला हवे. १६ जे बाहेर पडले ते दोन तृतियांश होत नाहीत. घटनेशी विसंगत गोष्ट, यामुळे घटनेमुळे ते अपात्र ठरायला हवेत. शिंदे राजीनामा देणार, म्हणजे हे सरकार पडणार. माझ्यामते कोणालाही बहुमत मिळत नाहीय. नार्वेकर इंग्लंडवरून काय शोध लावून येतील माहिती नाही. परंतू राज्यात राष्ट्रपती राजवट येईल, सहा महिन्यांच्या आत निवडणूक घ्यावी लागेल. महाराष्ट्राची जनता ठरवेल ठाकरे बरोबर की शिंदे की फडणवीस. अंतिम अधिकार जनतेकडे असेल, असे बापट म्हणाले. 

आताच्या ज्या पाच जणांच्या बेंचने दिलेला निर्णय हा महाराष्ट्रापुरताच लागू होणार आहे. रेबियासह आतापर्यंत तीन खटले झालेत. सातचे बेंच नेमून याचा निर्णय करता येईल, यामुळे कायदा भारतभर लागू होईल. परंतू ते पुढचे पाऊल झाले. हा खटला पुढे सात जणांकडे नेणे चुकीचे ठरेल, असेही बापट यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना