रायगड जिल्ह्यातील ८५ यांत्रिकी नौकांची आयडी नोंदणी रद्द
By Admin | Updated: April 8, 2017 04:07 IST2017-04-08T04:07:47+5:302017-04-08T04:07:47+5:30
यांत्रिक नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र आयडीमधून रद्द करून, इनलॅन्ड व्हेसल अॅक्ट १९१७अंतर्गत आजतागायत नोंदणी केलेली नाही

रायगड जिल्ह्यातील ८५ यांत्रिकी नौकांची आयडी नोंदणी रद्द
अलिबाग : राजपुरी बंदरे समूह प्रादेशिक बंदर अधिकारी या कार्यालयामार्फत आयडी (आयडेंटी फिकेशन)अंतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या नौकांच्या नौका मालकांकडून त्यांच्या नावे असलेल्या यांत्रिक नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र आयडीमधून रद्द करून, इनलॅन्ड व्हेसल अॅक्ट १९१७अंतर्गत आजतागायत नोंदणी केलेली नाही, अशा सर्व यांत्रिक नौकांचे (मासेमारी नौका वगळून) आयडी नोंदणी प्रमाणपत्र कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असल्याची माहिती अांतरदेशीय जहाज नोंदणी अधिकारी तथा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड प्रादेशिक बंदर अधिकारी कॅ. सुरज नाईक यांनी दिली आहे.
महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुख्य बंदर अधिकारी यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील यांत्रिक बोटींची नोंदणी आयडीअंतर्गत करण्यात आल्यास अशा सर्व बोटींची नोंदणी रद्द करून इनलॅन्ड व्हेसल अॅक्ट १९१७अंतर्गत करण्याबाबत (मासेमारी नौका वगळून) या कार्यालयास कळविण्यात आले होते. इनलॅन्ड व्हेसल अॅक्ट १९१७अंतर्गत आजतागायत नोंदणी केलेली नाही त्यांचे आयडी नोंदणी प्रमाणपत्र रद्द झाले असून संबंधित नौकाचालकांनी याची नोंद घ्यावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)