शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

IAS अधिकारी तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; आता 'या' खात्याची मिळाली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2024 15:41 IST

Tukaram Mundhe Transfer : तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे.

मुंबई : राज्यातील सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी बदलीचे आदेश जारी केले आहेत. बदली झालेल्या आयएएस अधिकाऱ्यांमध्ये तुकाराम मुंढे यांचा देखील समावेश आहेत. दरम्यान, गेल्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत तुकाराम मुंढे यांची ही २२ वी बदली आहे. तुकाराम मुंढे यांच्याशिवाय रणजीत कुमार, नीमा अरोरा, व्ही राधा, अमन मित्तल, अमगोथू श्रीरंगा नायक, रोहन घुगे या अधिकाऱ्यांची सुद्धा बदली करण्यात आले आहे.

तुकाराम मुंढे हे आपल्या धडाडीच्या कामामुळे प्रसिद्ध राहिले आहेत, तर राजकीय नेत्यांसोबत सातत्याने खटके उडाल्याने वादग्रस्त अधिकारी म्हणूनही त्यांनी ओळख राजकीय वर्तुळात आहे. मात्र, तुकाराम मुंढे आणि बदली हे नवं समीकरण राज्यात गेल्या काही वर्षात पाहायला मिळत आहे. गेल्यावर्षी पशुसंवर्धन आणि दुग्ध विकासाच्या सचिवपदी बदली करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे यांची आता पुन्हा एकदा बदली झाली आहे. आता त्यांच्याकडे असंघटित कामगार विभागाचे (मुंबई) विकास आयुक्त म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांच्याकडे असलेल्या सध्याच्या पदाचा कार्यभार राजेश कुमार यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. 

तुकाराम मुंढे २००५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांनी सोलापूरचे उपजिल्हाधिकारी म्हणून ऑगस्ट २००५ मध्ये आपल्या प्रशासकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर, विविध जिल्ह्यात जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्त आणि सचिवपदी त्यांनी कारकीर्द गाजवली. कर्मचाऱ्यांना कडक शिस्त लावण्याच्या हेतूने तुकाराम मुंढे जे निर्णय घेतात, तेच त्यांच्या बदलीचे कारण ठरते, अशी चर्चा नेहमीच असते. मात्र, सातत्याने बदली होणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख राज्यात झाली आहे. तुकाराम मुंडे यांच्या १९ वर्षांच्या कारकिर्दीत २२ वेळा बदली झाली आहे.

आयएएस अधिकारी बदल्यांची यादी तुकाराम मुंडे- विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबईरणजीत कुमार - अतिरिक्त महासंचालक, यशदा, पुणेनीमा अरोरा - सह आयुक्त वस्तू व सेवा कर, मुंबईव्ही राधा - प्रधान सचिव (कृषी), कृषी व पदुम विभाग, मंत्रालय, मुंबईअमन मित्तल - सह मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र इन्स्टिट्युशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशन-मित्र, मुंबईअमगोथू श्रीरंगा नायक - आयुक्त (कुटुंब कल्याण) व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईरोहन घुगे- मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (ठाणे)

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढेTransferबदली