शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

...तर मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, धर्मा पाटलांच्या पुत्राचा सरकारला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:16 IST

खासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते.

मुंबई- विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी जेजे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याबरोबर वैद्यकीय अधिकाऱ्यांसह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. जर सरकारने योग्य मदत दिली नाही तर बापाने मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय. मी दिल्लीत जाऊन आत्महत्या करेन, असा इशाराही नरेंद्र पाटील यांनी दिलाय.दरम्यान, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना विखे पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे मागील अनेक घटनांमधून स्पष्ट झाले आहे. मेक इन महाराष्ट्र आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचं धोरण मूठभर धनदांडग्यांच्या गल्ला भरणारे आणि शेतकर्‍यांना आत्महत्येसाठी चिथावणी देणारे धोरण आहे.  हे सरकार शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शेतकर्‍यांची फसवणूक करते आहे. धुळे जिल्ह्यातील एका मंत्र्याला तो मंत्री असल्याने तात्काळ जमिनीची खातेफोड करून मिळते, पण धर्मा पाटील सारख्या कोणताही वशिला अन् राजाश्रय नसलेल्या शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन विष घ्यावे लागते, ही परिस्थिती या सरकारने आज राज्यात निर्माण केली आहे.

धर्मा पाटील यांना सरकारने अत्यल्प मोबदला देण्यासंदर्भात विखे पाटील पुढे म्हणाले की, हे सरकार शेतकऱ्यांंची कमी पैशात बोळवण करण्याचा प्रयत्न करते आहे. सरकारी दलालांमार्फत येणार्‍या शेतकर्‍यांना योग्य किंमत मिळते. पण दलालाच्या तुंबड्या न भरणाऱ्या शेतकर्‍यांवर जीव देण्याची वेळ येते, यातून हे सरकार नेमका काय संदेश देते आहे? आता धर्मा पाटलांनी विष घेतल्यावर सरकार अनुदान देण्याच्या घोषणा करते. मग हे शहाणपण आधीच का नाही सूचले? शेतकर्‍यांना सरकारी अनुदानाची भीक नको, आपल्या जमिनीची योग्य किंमत हवी आहे. धर्मा पाटील सारख्या सर्वसामान्य शेतकर्‍याला न्याय का नाकारला गेला, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी केली.

राजू शेट्टींनी घेतली धर्मा पाटलांची भेटखासदार राजू शेट्टी यांनी जे जे रुग्णालयात जाऊन मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी रविकांत तुपकर यांच्यासह धर्मा पाटील यांचे पुत्र नरेंद्र पाटील देखील उपस्थित होते. राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रालयात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याशिवाय सरकारला जाग येत नाही, हे या घटनांमधून स्पष्ट झाले आहे, असं खासदार राजू शेट्टी म्हणाले.धर्मा पाटील यांना 200 गुंठे बागायती शेतीसाठी 4 लाख रुपये नुकसानभरपाई सरकारनं देऊ केली. मात्र दुसरीकडे त्याच गटातील 74 गुंठे शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्याला 1 कोटी 89 लाख रुपये भरपाई मिळते आहे, सरकार असा दुजाभाव का करतंय. ऊर्जामंत्री बावनकुळेंनी हा कोणता नवा जावईशोध लावलाय, असा सवाल उपस्थित करत खासदार राजू शेट्टी सरकारवर टीका करण्याचा प्रयत्न केला आहे. धर्मा पाटील यांच्या मुलाने सरकारने देऊ केलेली 15 लाखांची मदत नाकारली आहे. 

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्याRaju Shettyराजू शेट्टीRadhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील