शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
2
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
3
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
4
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
5
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
6
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
7
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
8
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
9
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
10
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
11
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
12
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
13
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
14
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
15
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
16
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
17
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
18
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
20
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

 मला सिंधुदुर्गच्या पर्यटनाचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला आवडेल- जॉकी श्रॉफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2017 22:26 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध  अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते.

अनंत जाधवसावंतवाडी, दि. 10 - सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी अनेक वेळा आलो आहे. येथे निसर्गाचा खरा खजिना पर्यटनात आहे. त्यामुळे या निसर्गाचा फायदा पुढील पिढीला होणे गरजेचे आहे. त्यासाठी मला येथील पर्यटनवाढीसाठी सिंधुदुर्ग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल, असे मत प्रसिद्ध  अभिनेते जॉकी श्रॉफ यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. ते सावंतवाडी येथे बोलत होते.अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर व दिग्दर्शक महावीर जैन यांच्यासमवेत रेडीतील यशवंतगड, सावंतवाडीतील राजवाडा, शिल्पग्राम, हेल्थफार्म, सार्वजनिक गणपती मंदिराला भेट दिली. अभिनेता जॉकी श्रॉफ म्हणाले, मी अनेक वेळा सिंधुदुर्गामध्ये आलो आहे. दोडामार्गपासून विजयदुर्गपर्यंत सर्व ठिकाणच्या पर्यटनाचा आनंदही लुटला आहे.सिंधुदुर्ग माझ्या आवडीचे ठिकाण असून, येथे मला चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास आवडेल, असे त्यांनी सांगितले. येथील हवा भरपूर शुद्ध आहे. समुद्रकिनारे तर भरपूर स्वच्छ आहेत. प्रत्येकाने स्वत:च्या घरासारखी काळजी घ्यावी. तरच आम्ही आणखी जास्त काळ येथील निसर्ग टिकवून ठेवू शकतो.आंबोलीतील धबधबे बघून मला अतिशय आनंद होत आहे. देवबाग तसेच तारकर्ली-मोचेमाड येथील बीच तर आनंददायी आहेत. फक्त आपण याचा वापर कसा करून घेतो त्यावर आहे. बाजूचे गोवा राज्य हे पर्यटनामध्ये पुढे आहे. पण त्यापेक्षा अधिकचे पर्यटन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. मी सकाळपासून आरोंदा येथील बॅक वॉटर पाहिला. तसेच रेडीतील यशवंत गड बघितला आहे. त्यानंतर आणखी पर्यटनाचे काही प्रकल्प पाहणार आहे. त्यानंतर येथे काय करायचे ते ठरविले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. निसर्गाचा हा खजिना बघून माझा काही तरी येथे वापर करून सरकारने घ्यावा. माझ्या शरीराचा वापर जर या ठिकाणच्या उत्कर्षाला होत असेल, तर कधीही मी ते द्यायला तयार आहे. मला या ठिकाणचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर व्हायला नक्कीच आवडेल. पण हे सर्व सरकारच्या हातात आहे. मंत्री दीपक केसरकर यांनी ठरविले तर होऊ शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले.राजवाडा बघून जॉकी भारवलासावंतवाडीतील प्रसिद्ध असा राजवाडा बघून अभिनेता जॉकी श्रॉफ चांगलाच भारावून गेला. त्यांनी राजवाड्यातील गंजिफा खेळाची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच राजमाता सत्वशिलादेवी भोसले यांच्याकडून माहितीही घेतली. यावेळी अभिनेता श्रॉफ यांनी राजे खेमसावंत भोसले, शुभदादेवी भोसले, लखनराजे भोसले यांच्याशी गप्प मारल्या. यावेळी अभिनेता जॉकी श्रॉफ यांनी आपल्या सिंधुदुर्ग सफारीला ही चांगलाच उजाळा दिला.