शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

सभागृहात एकनाथ शिंदेंआधी मी का बोललो? फडणवीसांनी सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:40 IST

भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे.

भाजपा शिवसेनेला मिळालेला जनादेश फसवून पळविण्यात आला. गेल्या अडीच वर्षांत काही झाले नाही. शिंदे अस्वस्थ होते, त्यांनी मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्या आमदारांना कळत नव्हते की लोकांकडे जाऊन उद्या काय तोंड दाखविणार? कशाच्या आधारावर मते मागणार? ज्या हिंदुत्वावर पक्ष उभा राहिला, त्यावर बोलूही शकत नाही, यामुळे शिवसेनेमध्ये आमदारांनी उठाव केल्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

भाजपावर आरोप होत होते, की आम्ही हे सारे सत्तेसाठी करत आहोत. सत्तेला हपापलेले आहोत. परंतू पक्षाने आपण सत्तेला हपापलेले नाही, हा संदेश एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून दिला आहे. सरकार बाहेर बसून सरकार चालविता येत नाही, यामुळे नड्डा, शहा यांनी मला फोन करून सत्तेत सहभागी होण्यास सांगितले. म्हणून मी उप मुख्यमंत्री झालो. पक्षाने त्य़ा दिवशी घरी जा असे जरी सांगितले असते, तरी मी निमूटपणे घरी आलो असतो, असे फडणवीस म्हणाले. 

आता मी एकनाथ शिंदे यांना यशस्वी मुख्यमंत्री करण्यासाठी झटणार आहे. त्यांच्यात तेवढी ताकद आहे. राज्याच विकास मविआने थांबविला होता. मोदी सरकारने त्यांना पाणी पाजले आहे. आज त्यांच्या पक्षाची अवस्था काय झालीय हे तुम्ही पाहताय. भाजपा नेतृत्वाने चांगला निर्णय घेतला, असे फडणवीस म्हणाले. 

सोन्याचा चमचा घेऊन काही जण जन्म घेतात. उद्धव ठाकरे फार काळ अधिवेशनात आले नाहीत, त्यांचा दोष नाहीय. बहुमत जिंकल्यावर मुख्यमंत्री पहिले भाषण करत नाहीत, ते शेवटी आभार मानतात. त्यामुळे उप मुख्यमंत्री म्हणून पहिला बोललो. ते देखील प्रथेप्रमाणे, असे फडणवीस म्हणाले. उद्या परवा बसून आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरवू, आमच्यासाठी महत्वाचे म्हणजे शिंदेंचे ठाणे आणि माझे नागपूर होते, त्या लोकांना पहिल्यांदा भेटण्यासाठी आलो, असेही ते म्हणाले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना