शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
4
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
5
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
6
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
7
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
8
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
9
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
10
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
11
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
12
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
13
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
14
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
15
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
16
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
17
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
18
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
19
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...
20
जावेसोबतच्या भांडणाचा राग अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचं षडयंत्र; पिठात विष मिसळलं, पण...

"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 18:49 IST

नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही असं खेडेकरांनी म्हटलं.

मुंबई - मागील काही दिवसांपासून कोकणातील मनसे नेते वैभव खेडेकर हे पक्षात नाराज असल्याच्या बातम्या पुढे येत होत्या. खेडेकर यांनीही पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. मात्र आज वैभव खेडेकर यांनी मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांची भेट घेतली. या भेटीनंतर खेडेकर यांनी मी पक्षासोबतच कायम राहणार असल्याचं स्पष्ट केले आहे.

मनसे नेते वैभव खेडेकर म्हणाले की, मी ३० वर्ष साहेबांसोबत पक्ष स्थापनेपासून आहे. मी नाराज वैगेरे नव्हतो. माझे जे काही म्हणणं होते ते मी मांडले होते. माझ्या नाराजीची बरीच चर्चा माध्यमांत झाली. इतर पक्षात जाणार वैगेरे बातम्या चालल्या. मला दुसऱ्या पक्षांच्या ऑफर असल्या तरीही मी अडचणीच्या काळात पक्षासोबत आहे आणि भविष्यातही राहील. आमचे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव यांनी मला बोलावले. माझं म्हणणं ऐकले, आमची चर्चा झाली. कदाचित उद्या संध्याकाळी साहेबांची भेट होईल. त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा होईल. आम्ही पोटात एक आणि ओठात एक असे नाही. त्यामुळे जे मी बोललो तेच साहेबांसमोर मांडणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच नाराजीबाबत पक्षांतर्गत विषय आहे. त्याबाबत मी पक्षाची चौकट मोडून बोलणार नाही. साहेबांशी बोलेन, त्यांच्याशी चर्चा करून समाधान घेईन आणि आपल्याशी बोलेल. मी जे काही मांडले आहे त्यावर संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आमच्याकडे खूप काही नाही, जे मला मिळवायचे आहे. जे आहे त्यात सुसूत्रता करून घेणे आमचे काम आहे. माझे पक्षातील काम बंद नाही. आमच्याकडे अवकाळी पाऊस पडला त्याबाबत कालच मी प्रशासनाला निवेदन दिले आहे असंही वैभव खेडेकर यांनी म्हटलं.

दरम्यान, मी नाराज होऊन घरी बसलो नाही. आजही मी रणांगणात आहे. काम करतोय. माझ्या म्हणण्याची दखल घेतली आहे. म्हणणं मांडणे ही राजकीय प्रक्रिया असते. त्यातून मार्ग नक्कीच निघेल. राजकीय जीवनात चांगले काम करणाऱ्यावर अनेक पक्षांची नजर असते. आम्ही देखील इतर पक्षातील चांगल्या कार्यकर्त्यावर नजर ठेवतो, तसेच माझ्या बाबतीत झाले असेल. राजकीय प्रवाहात या गोष्टी घडत असतात परंतु निष्ठा त्या पुढचे पाऊल असते. निष्ठा खूप महत्त्वाची असते. निष्ठा पाहणारे समाजात खूप लोक आहेत. मला काय मिळण्यापेक्षा मी समाजाला काय देऊ शकतो हे पाहायचे असते. प्रलोभन आणि निष्ठा यात निष्ठा महत्त्वाची आहे. मी राजसाहेबांची साथ सोडणार नाही, मला कुणी काम थांबवायला सांगितले तर थांबवेन असंही वैभव खेडेकर यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेSandeep Deshpandeसंदीप देशपांडेAvinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेVaibhav Khedekarवैभव खेडेकर