शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

"आमदारांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, गरज पडल्यास टोकाचं पाऊल उचलेन", मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2022 16:32 IST

Eknath Shinde : आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.

पंढरपूर : पंढरपुरात आयोजित मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. यावेळी ५० आमदारांनी विश्वास दाखवणं ही साधी गोष्ट नाही. ही एक  ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. या मेळाव्याला शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "हा मेळावा एकनाथ शिंदे गटाचा नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा आहे. आज केवळ आंनद दिघे यांच्या आशीर्वादाने इथे उभा आहे. धर्मवीरमध्ये सगळा प्रसंग दाखवता आला नाही. गेल्या वीस ते 22 वर्ष झाले माझ्या आयुष्यात खूप कठीण प्रसंग आले. पण मी डगमगलो नाही. आताही डगमगणार नाही. मी जास्त बोलत नाही. तसेच, टीकाकारांना कामातून उत्तर देईन." 

याचबरोबर, मी कमी बोलतो आणि जास्त एकतो. सभागृहात देखील मी कमी बोललो. पण वेळ आल्यावर सर्वकाही सांगेन. माझ्यावर ५० आमदारांनी विश्वास दाखवणे, ही साधी गोष्ट नाही. ही एक ऐतिहासिक घटना आहे. या घटनेचे जगातील ३३ देशांनी कौतुक केले आहे. आमदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. गरज पडल्यास टोकाचे पाऊल उचलेन, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. दरम्यान, मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी एकनाथ शिंदे यांना थोडा उशिर झाला. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त करत ऑपरेशन मोडमध्ये गेल्यानंतर असाच उशीर होतोय, अशी टिप्पणी केली. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. 

सर्वांना चांगले दिवस येऊ द्या - मुख्यमंत्रीआषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता शिंदे यांच्या हस्ते शासकीय पूजा संपन्न झाली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांची संवाद साधला. यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांला आषाढी एकादशीच्या पूजेचा मान मिळाला, हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस आहे. माझे वडील या ठिकाणी होते, माझा मुलगाही या ठिकाणी होता आणि नातूही, हे भाग्य सर्वांनाच मिळाले पाहिजे. पांडुरंगाला सर्वकाही माहीत असते. पाऊस उशिरा सुरू झाला आहे, पण चांगला सुरू झाला आहे. कुठेही अतिवृष्टी होऊ नये, बळीराजा सुखावला पाहिजे, चांगला पाऊस होऊ द्या, बळीराजा आपला मायबाप आहे. सर्व संकट दूर होऊ द्या, कोरोनाचा नायनाट होऊ द्या, सर्वांना चांगले दिवस येऊ द्या, असे साकडे मी पांडुरंगाकडे घातलंे आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेPandharpurपंढरपूरSolapurसोलापूरPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ