शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

'मी मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, पवारांनाही भेटेन; पण आता तरी पक्ष सोडण्याचा विचार नाही!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 12:18 IST

मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका.

नागपूरः मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही, असं म्हणत एकनाथ खडसेंनी भाजपा सोडण्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. नागुपरात कोणाचीही भेट घेतली नाही. या साऱ्या अफवा आहेत. विधानभवनात कामानिमित्त आलो आहे. मुख्यमंत्र्यांनाही भेटेन, शरद पवारांनाही भेटेन, याचा अर्थ वेगळा काढू नका. कोणत्याही प्रकारे पक्ष बदलण्याचा आज विषय नाही. माझं मन वळवण्याचा प्रश्नच येत नाही. मी निर्णय घेतला असता तर वरिष्ठांवर मन वळवण्याचा प्रसंग आला असता. मी वरिष्ठांसोबत कायम संपर्कात असतो, असंही खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहेत. भाजपावर नाराज असलेले एकनाथ खडसे नागपुरात दाखल झालेले असून, ते लवकरच शरद पवारांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे. तसेच विदर्भ दौऱ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारदेखील नागपुरात आहेत. एकनाथ खडसे भाजपातील ज्येष्ठ नेते आहेत. गेल्या 45 वर्षांहून अधिक काळ ते भाजपात सक्रिय आहेत. मात्र गेल्या 5 वर्षांत खडसे पक्ष नेतृत्वावर नाराज आहेत. पक्षासाठी इतका संघर्ष करूनही माझ्यावर अन्याय झाला, अशी भावना एकनाथ खडसेंनी वारंवार बोलून दाखविली आहे. याच पार्श्वभूमीवर अनेकदा एकनाथ खडसे पक्ष सोडणार अशी चर्चा सुरु होती. पण खडसेंनी या अफवा असल्याचं म्हटलं होतं. परंतु गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त परळीत घेण्यात आलेल्या मेळाव्यात एकनाथ खडसेंनी जाहीर व्यासपीठावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. शेठजी, भटजी पक्ष म्हणून भाजपाची ओळख होती. त्याला बहुजनाचा चेहरा देण्याचं काम गोपीनाथ मुंडे यांनी केलं. जे 40 वर्ष पक्षासाठी झटले त्यांना अशी वागणूक का? आम्ही बाहेर पडत नाही तर आम्हाला तसं करण्यासाठी प्रवृत्त केलं जात आहे. वरवर गोड बोलतात आणि पक्ष सोडून गेलं पाहिजे असं वागतात असा आरोप एकनाथ खडसेंनी नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. एकनाथ खडसेंनी ज्या पद्धतीनं भाषण केलं, त्यावर पक्षनेतृत्व नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे एकनाथ खडसे भाजपाला रामराम करणार की पक्षातच राहणार? हे येत्या काळात समजणार आहे. 

टॅग्स :Eknath Khadaseएकनाथ खडसे