शहरं
Join us  
Trending Stories
1
'देश वाचवण्यासाठी मी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
2
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
3
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
4
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
5
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
6
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांचा खोचक टोला
7
४ जूनपूर्वीच भाजपाला खूशखबर, अरुणाचल प्रदेशमध्ये मिळवला दणदणीत विजय
8
NDA आणि INDIAच्या लढतीत ही पाच राज्यं ठरली निर्णायक, बिघडवला ‘इंडिया’चा खेळ
9
रवीना टंडनची काहीही चूक नाही? ती नशेत नव्हती? CCTV फूटेजमुळे समोर आली वेगळीच कहाणी
10
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
11
पॅरिसवरुन मुंबईला येणाऱ्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 306 प्रवाशांचा जीव टांगणीला
12
"निवडणुकीसाठी मी तयार नव्हतो पण..."; चंद्रपूरच्या एक्झिट पोलनंतर मुनगंटीवारांचे सूचक विधान
13
अमेरिका पुन्हा हादरली! बर्थडे पार्टीत अंदाधुंद गोळीबार; २७ जणांना लागल्या गोळ्या, एकाचा मृत्यू
14
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालाचे गाणे ऐका, कळेल.."
15
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
16
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
17
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
18
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
20
स्ट्रगलच्या काळात राजकुमार रावची झालेली १० हजारांची फसवणूक, असं काय घडलं होतं?

"होय, मला राग आहे..."; अजित पवारांविरोधात विजय शिवतारे संतापले; बारामती लढवणारच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 11:37 AM

बारामतीत फक्त पवारच का, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे असं विजय शिवतारेंनी म्हटलं. 

भोर - Vijay Shivtare on Ajit Pawar ( Marathi News ) माझं बंड नाही, बारामती मतदारसंघात ५ लाख ५० हजार मतदार हे पवारांच्या विरोधातलं आहे. ज्यांना सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवारांना मतदान द्यायचे नाही त्यांनी करायचे काय? त्या लोकांना लोकशाहीतील हक्क बजावण्यासाठी मी बारामती निवडणूक लढवणार आहे. जनतेच्या आग्रहामुळे मला उभं राहावं लागतंय. त्यामुळे मला बंडखोर म्हणू नका. पवार कुटुंबाला अनेक लोक कंटाळलेत अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीत निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केले. 

विजय शिवतारे म्हणाले की, पवारांमुळे भोरचा सुपुत्र राज्याचा मुख्यमंत्री झाला नाही. युती धर्म आपल्याला पाळला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मी प्रामाणिकपणे सांगितले, माझी पंतप्रधानांवर निष्ठा आहे. युतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आला पाहिजे या मताचा मीदेखील आहे. अजित पवार ही जागा जिंकू शकत नाही हे त्रिवार सत्य आहे. मग ती जागा जिंकणारच नसतील तर मी जे पवार कुटुंबाच्या विरोधात जे आहेत त्यांचे नेतृत्व करण्याची संधी मिळत असेल तर का करू नये असा सवाल त्यांनी विचारला. 

तसेच वैयक्तिकपणे मी अजित पवारांना माफ केले आहे. पण अजितदादांची गुरमी जाणार नाही. २०१४, २०१९ मध्ये मी लोकसभा निवडणुकीसाठी प्रयत्न केले होते. जानकारांऐवजी मला तिकीट मिळाले असते तर मी त्याच वेळी निवडून आलो असतो. बारामती लोकसभा मतदारसंघावर कुणाचा सातबारा नाही. बारामतीत फक्त पवारच का, आणखी कुणी नाही का? प्रस्थापित घराणेशाहीविरोधात ही लढाई असून त्यासाठी मी उभा आहे असं विजय शिवतारेंनी म्हटलं. 

दरम्यान, बारामतीत नमो रोजगार मेळाव्यावेळी मी गेलो होतो, तिथे मुख्यमंत्री, २ उपमुख्यमंत्री यांच्यासाठी बुके आणला होता. पण अजित पवारांमध्ये कुठलीही माणुसकी नाही. इतका गर्व आहे त्यांनी बुके घेतला आणि बाजूला गेले.  आज माझ्यावर प्रेम करणारी लाखो लोक आहेत. मी माझा प्रयत्न केला होता. गुंजवणी धरणासाठी मी उपोषण केले तेव्हा पालकमंत्री असूनही ते आले नाहीत. मरतोय तर मरू दे हे बोलणारे, दुर्दैवाने माझी त्यात किडनी गेली, मृत्यूला कवटाळून परत आलेला माणूस आहे. कदाचित देवाने मला यासाठी पुढे आणले असावे. निधी वाटपात कायम दुजाभाव, विकासात अडथळा आणण्याचा प्रयत्न अजित पवारांनी कायम खालच्या पातळीवर केले हा राग माझ्या मनात कायम असणार आहे असंही विजय शिवतारे यांनी सांगितले. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेAjit Pawarअजित पवारbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४