मी देशाचा सदैव ऋणी राहीन!
By Admin | Updated: May 17, 2014 22:36 IST2014-05-17T22:36:12+5:302014-05-17T22:36:12+5:30
कठीण काळात सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले.

मी देशाचा सदैव ऋणी राहीन!
>कृतार्थ मनमोहन सिंग यांचे अखेरचे भाषण : जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतात
कठीण काळात सलग 1क्वर्षे समर्थपणो नेतृत्व केल्यानंतर डॉ. मनमोहन सिंग शनिवारी कृतार्थ भावनेने पंतप्रधान पदावरून पायउतार झाले. राष्ट्रपतींकडे आपल्या सरकारचा राजीनामा सुपूर्द करण्याआधी डॉ. सिंग यांनी आपल्या मितभाषी स्वभावाला साजेसे असे राष्ट्राला उद्देशून अखेरचे भाषण केले व देशवासीयांनी दिलेल्या उदंड प्रेमाबद्दल आभार मानले. महान राष्ट्र म्हणून जगाला दिशा दाखविण्याचे सामथ्र्य भारतामध्ये निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त करीत असतानाच त्या दिशेने मार्गक्रमण करण्यासाठी त्यांनी सत्तेवर येणा:या नव्या सरकारला शुभेच्छाही दिल्या.
आयुष्याची 6क् वर्षे देशसेवेसाठी वेचलेल्या डॉ. सिंग यांनी सार्वजनिक जीवनातून ‘एक्ङिाट’ घेण्यापूर्वी केलेले हे शेवटचे भाषण असे:
‘माङया प्रिय देशवासीयांनो, भारताचा पंतप्रधान या नात्याने मी आपणास हे शेवटचे संबोधित करीत आहे. दहा वर्षापूर्वी ही जबाबदारी माङयावर सोपविली गेली तेव्हा चिकाटी हे साधन हाती घेऊन, मार्गदर्शनासाठी सत्यरूपी प्रकाशशलाका समोर ठेवून व नेहमी हातून योग्य तेच काम होण्याची प्रार्थना मनी ठेवून मी या कामाला सुरुवात केली होती.
आज मी पायउतार होत आहे, पण परमेश्वराकडून दिल्या जाणा:या अंतिम निर्णयाची प्रतीक्षा करीत असताना, जनतेने दिलेल्या पदावर बसणा:या प्रत्येकाला व सरकारांनाही जनतेच्या दरबारातील निकालास सामोरे जावे लागते, याची मला कल्पना आहे.
देशवासीयांनो, तुम्ही दिलेला निकाल आमच्यापैकी प्रत्येकाला शिरसावंद्य आहे. नुकत्याच संपलेल्या निवडणुकांनी आपल्या लोकशाहीचा पाया अधिकच भक्कम झाला आहे.
याआधीही मी अनेक वेळा म्हटल्याप्रमाणो, माङो जीवन व सार्वजनिक पदावरील कार्यकाळ हे खुले पुस्तक आहे. या आपल्या महान राष्ट्राची होता होईतो सेवा करण्याची मी शिकस्त केली आहे. गेल्या दहा वर्षात एक राष्ट्र म्हणून आपण अभिमान वाटावा असे यश व उपलब्धी अनेक बाबतीत साध्य केली आहे. आज भारत अनेक बाबतीत, दहा वर्षापूर्वी होता त्याहून कितीतरी अधिक बलवान राष्ट्र झाला आहे. या सर्व यशाचे श्रेय तुमचेच आहे. पण तरीही या देशात अजूनही कितीतरी विकासक्षमता सुप्तावस्थेत आहे व ती वापरण्यासाठी आपण सर्वानी एकजुटीने प्रयत्न करायला हवेत.
पदावरून दूर होताना, तुम्ही दिलेले प्रेम व ममत्वाच्या स्मृती माङया मनात चिरकाल राहतील. मला आयुष्यात जे काही मिळाले ते सर्व या महान देशानेच दिलेले आहे. फाळणीने पोळलेल्या माङयासारख्या उपेक्षित व्यक्तीला प्रगती करून उच्च पद भूषविण्याचे बळ याच देशाने दिले. देशाचे माङयावरील हे ऋण कधीही फेडता न येणारे तर आहेच; पण जे कायम एक अलंकार म्हणून मिरवावे असेही आहे. मित्रंनो, मला भारताच्या भवितव्याबद्दल उदंड विश्वास आहे. उदयोन्मुख जागतिक अर्थव्यवस्थेचे ऊर्जास्थान म्हणून भारताने भूमिका बजावण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे, असे माङो ठाम मत आहे. परंपरा व आधुनिकता आणि एकता व विविधता यांचा मेळ घालून आपला देश जगाचा मार्गदर्शक ठरू शकतो. या देशाची सेवा करता आली हे मी भाग्य समजतो. माझी याहून जास्त काही अपेक्षाही नाही. नव्या सरकारला त्यांच्या कामात मी सुयश चिंतितो व आपल्या देशास उत्तरोत्तर यश मिळत राहो, अशी प्रार्थना करतो.
धन्यवाद, जयहिंद.
-सखोल अध्ययन व दूरदृष्टीने आर्थिक क्षेत्रत आपल्या कर्तृत्वाचे मानदंड निर्माण करणा:या डॉ. मनमोहनसिंग यांनी पंतप्रधानपद एक दशक सांभाळल्यानंतर शनिवारी त्याचा राजीनामा दिला.
- भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर दुस:यांदा पंतप्रधान बनण्याचा मान फक्त डॉ. सिंग यांच्याच वाटय़ाला आला. संपुआ सरकारच्या दोन मोठय़ा घोटाळ्यांचा परिणाम त्यांच्या पंतप्रधानपदाच्या कामावर मात करणारा ठरला.
-1991 साली देश आर्थिक संकटातून वाटचाल करीत होता तेव्हा माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात डॉ. सिंग यांची अर्थमंत्री म्हणून वर्णी लागली. त्या आर्थिक संकटातून देशाला बाहेर काढले.
-सहकारी पक्षांच्या विरोधाला तोंड देत अमेरिकेसोबत अणुऊर्जा करार करून त्यांनी भारताविरुद्ध लागलेल्या र्निबधांना संपविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले.
-सोनिया गांधी यांनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर डॉ. सिंग हे पहिले शीख पंतप्रधान बनले. त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी शपथ दिली होती.