शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘रेल के सफर में तुझे सुरक्षित जाते देखा!’; बोर्डीतील शेतकऱ्याच्या कवितेची रेल्वेमंत्र्यांकडून दखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2021 00:26 IST

पीयूष गोयलांचे ट्विट, किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली,

अनिरुद्ध पाटील बोर्डी : रेल के सफर में तुझे सुरक्षित, संभलकर जाते देखा, व्यापारियों के हौसला में बदलाव आते देखा... भारतीय रेल्वेने किसान रेल्वेच्या माध्यमातून डहाणू तालुक्यातील उत्पादित चिकू फळ दिल्ली बाजारपेठेत कमी वेळेत व उत्पादन खर्चात पोहोचत असून, बागायतदारांच्या जीवनात बदल घडवला आहे, अशी भावना व्यक्त करणाऱ्या बोर्डीतील बागायतदाराच्या कवितेची दखल रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी घेत ती ट्विट केली आहे. त्यानंतर या कवितेची चर्चा देशभर होत आहे.

किसान रेल्वेमुळे डहाणूतील शेतकऱ्यांना झालेला आनंद, बोर्डीतील बागायतदार प्रीत पाटील यांनी कवितेतून मांडला. या कवितेत चिकू फळाला आरामदायी गादीवरून प्रवास करण्याची संधी मिळाली, गाडीत बसल्यानंतर खिडकीनजीक बसण्याचा आनंद लुटता येण्याबाबतचा उल्लेख आहे. ट्रकमधून उघड्यावर प्रवास करणाऱ्या चिकूला रेल्वेच्या डब्यातून सुरक्षित व आरामदायी प्रवास होऊ लागला. बाजारात पोहोचेपर्यंत फळाचा दर्जा चांगला राहणार आहे. व्यापाऱ्यांच्या दृष्टीनेही हे महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन कवितेत केले आहे. पाटील यांनी कविता बागायतदारांच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये पोस्ट केली. कृष्णा नावाच्या शेतकऱ्यामार्फत रेल्वे अधिकारी आणि त्यानंतर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यापर्यंत ही कविता पोहोचली. बागायतदारांच्या जीवनात या विशेष गाडीचे महत्त्व अधोरेखित करीत असल्याचे त्यांनी ट्विटमधून मांडले असून, त्यानंतर देशभर कवितेवर चर्चा सुरू झाली आहे.

रेल्वेने वाहतूक केल्यास खर्च येतो कमी रेल्वेतर्फे जानेवारीपासून डहाणू रोड ते दिल्ली स्थानकापर्यंत चिकूफळे निर्यातीसाठी सहा डब्यांची सुविधा उपलब्ध केली. तर गेल्या आठवड्यापासून पश्चिम रेल्वेने सहाऐवजी १२ डबे देत बागायतदारांना बोनस दिला आहे. डहाणू घोलवड भौगोलिक मानांकनप्राप्त चिकू २२ तासांत दिल्ली बाजारपेठेत पोहोचत आहेत. ट्रकद्वारे वाहतुकीला लागणाऱ्या आठ ते नऊ रुपये प्रति किलो खर्चाच्या तुलनेत रेल्वेने वाहतूक केल्यास दोन रुपयांपेक्षा कमी खर्च येतो. आठवड्यातून तीन वेळा ही विशेष शेतमाल घेऊन जाणारी गाडी डहाणू रोड स्थानकातून सोडली जाते. 

चिकूफळ निर्यातीला रेल्वे सुविधा निर्माण झाल्याने, डहाणूतील बागायतदारांच्या जीवनात घडलेल्या भावना कवितेतून मांडल्या. सोशल मीडियाद्वारे त्या रेल्वेमंत्र्यांपर्यंत पोहोचून त्याची दखल घेतली. शासनाच्या निर्णयाने शेवटच्या घटकापर्यंत, जीवनात होणारे बदल यातून व्यक्त होतात. - प्रीत पाटील, चिकू बागायतदार, बोर्डी

टॅग्स :railwayरेल्वेpiyush goyalपीयुष गोयलFarmerशेतकरी