शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
2
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले
3
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
4
८ मिनिटांत ८ अब्ज रुपयांचे दागिने चोरणारे चोर सापडले; पॅरिसच्या म्युझियममध्ये टाकलेला दरोडा
5
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
6
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
8
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
9
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
10
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
11
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
12
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
13
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
14
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
15
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
16
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
17
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
18
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
19
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
20
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 

"छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण..."; मुलाचा व्हिडीओ बघून जयंत पाटलांची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 10:54 IST

Jayant Patil News: छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या प्रसंगावर आधारित छावा चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

Jayat Patil post on chhava Movie: छावा चित्रपट बघून प्रेक्षक रडत असल्याचे अनेक व्हिडीओ तुम्ही बघितले असतील. यात एका लहान मुलाचा व्हिडीओही खूपच व्हायरल होत आहे. हाच व्हिडीओ पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक भावूक पोस्ट केली आहे. 'छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय', असेही जयंत पाटलांनी म्हटले आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपट सध्या प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहे. बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत असलेला हा चित्रपट बघून अनेकांना अश्रू आवरता आले नाहीत. चित्रपट बघून प्रेक्षक भारावून जाताना दिसताहेत.  छावा चित्रपट बघितल्यानंतर एक ५-६ वर्षांचा चिमुकला रडताना दिसत आहे. अश्रूंना वाट करून देतच तो 'महाराsssssज गडपती... गजअश्वपती...भूपती... प्रजापती... सुवर्णरत्नश्रीपती... अष्टवधानजागृत... अष्टप्रधानवेष्टित... न्यायालंकारमंडित... शस्त्रास्त्रशास्त्रपारंगत... राजनितिधुरंधर... प्रौढप्रतापपुरंदर... क्षत्रियकुलावतंस... सिंहासनाधिश्वर... महाराजाधिराज... राजाशिवछत्रपती महाराजांचा विजय असो', असे म्हणत आहे. 

लहान मुलाचा व्हिडीओ, जयंत पाटील काय म्हणाले?

या मुलाचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "या दाटलेल्या भावना, अश्रू भरल्या डोळ्यांच्या कडा आणि इतक्या लहान वयातील संवेदनशीलता पाहून मन भरून आले. छावा चित्रपट अद्याप पाहिलेला नाही, पण छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा या पिढीत खोलवर रुजूतेय याचे समाधान वाटतेय", अशी भावूक पोस्ट जयंत पाटील केली आहे. 

विकी कौशलने शेअर केला होता व्हिडीओ

या चिमुकल्याचा व्हिडीओ छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता विकी कौशलनेही शेअर केला होता. 

इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत विकी कौशलने म्हटले होते की, 'आमची सर्वात मोठी कमाई! बाळा, तुझा अभिमान वाटतो. तुला मिठी मारावी वाटतीये. तुम्हा सर्वांचे प्रेम आणि भावनांबद्दल खूप खूप आभार. जगाच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घरात शंभूराजांची कहाणी पोहोचावी, ही आमची इच्छा होती. हे सत्यात उतरताना पाहून जिंकल्यासारखं वाटतंय", असे विकी कौशल म्हणाला होता. 

 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलbollywoodबॉलिवूडSocial Viralसोशल व्हायरलVicky Kaushalविकी कौशल