शिर्डी - मी शिवभक्त आहे. दरवेळी शिर्डीला आलो की कुठल्यातरी महादेव मंदिरात जायचे म्हणून शिर्डीच्या वाटेवर असलेल्या ईशान्यश्वर मंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी मी जात होतो. त्यानिमित्ताने कॅप्टन अशोक खरात याच्याशी ओळख झाली. याशिवाय त्याच्या कोणत्याही कृत्यात माझा सहभाग नाही, असा खुलासा माजी मंत्री दीपक केसरकर यांनी शिर्डी येथे माध्यमांशी बोलताना दिला. श्रीराम नवमीनिमित्त शिर्डी येथे केसरकर यांनी रात्री साई समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, कॅप्टन खरात याला वाचवण्यासाठी माझा एखादा फोन गेला असेल तर ते चुकीचे आहे, परंतु असा कुठलाही प्रयत्न माझ्याकडून झालेला नाही, त्यामुळे मी दोषी असण्याचा प्रश्नच नाही. जे कृत्य झालेला आहे त्याची शिक्षा खरातला झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे. न्यायालय त्याला शिक्षा देईल अशी माझी खात्री आहे. मंत्री असताना माझ्याबरोबर पोलीस असायचे. मात्र पोलिसांनाही याची कल्पना नव्हती. खरा त्याच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल मला कोणतेही माहिती नव्हती. ईशानेश्वरच्या भक्ती पोटी खरात याच्याशी माझी ओळख झाली. ज्या महिलावर अत्याचार झाला त्यांना न्याय मिळवून देण्याची आमची भूमिका आहे. मी फक्त मंदिरात शिवलिंगाची पूजा केली आहे. याव्यतिरिक्त कोणतीही पूजा तिथे केली नाही. जवळ जवळ ३९ आमदार त्याला भेटून गेले, परंतु माझेच नाव समोर का येते हा एक प्रश्न आहे. महाराष्ट्रातील ज्योतिष कलेची खरात ने बदनामी केली आहे.
Web Summary : Deepak Kesarkar denies involvement with Ashok Kharat's crimes, citing temple acquaintance. He condemns the crime, supports justice for the victim, and questions why he's singled out, despite others visiting Kharat.
Web Summary : दीपक केसरकर ने अशोक खरात के अपराधों में शामिल होने से इनकार किया, मंदिर की जानपहचान का हवाला दिया। उन्होंने अपराध की निंदा की, पीड़िता के लिए न्याय का समर्थन किया, और सवाल किया कि खरात से मिलने के बावजूद उन्हें क्यों चुना गया।