शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

मनसे-भाजपा एकत्र येऊन निवडणूक लढवणार?; राज ठाकरेंचं तीन शब्दांत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2021 15:36 IST

भाजप-मनसे युतीच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं अवघ्या तीन शब्दांत उत्तर

नाशिक: भारतीय जनता पक्षासमोर असलेलं महाविकास आघाडीचं आव्हान, शिवसेनेनं साथ सोडल्यापासून एकाकी पडलेला भाजप आणि राज ठाकरेंनी हाती घेतलेला प्रखर हिंदुत्वाचा मुद्दा यावरून भाजप-मनसेच्या युतीचा विषय अनेकदा चर्चेत येतो. पुढील वर्षी होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी दोन्ही पक्ष याबद्दल चाचपणी करत असल्याची चर्चा आहे. याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरेंना नाशिकमधील पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. 

भाजप-मनसे युती होणार का, असा प्रश्न राज यांना विचारला गेला. त्यावर राज यांनी मला माहीत नाही, असं उत्तर दिलं. 'युतीच्या चर्चा तुम्हीच घडवून आणता. तुमचा सोर्स समजत नाही. अशा युतीच्या चर्चा सुरू असतील. पण त्या चर्चांबद्दल मला माहीत नाही, असं राज ठाकरे म्हणाले. 

सीडीएस बिपीन रावत यांचा गेल्या आठवड्यात अपघाती मृत्यू झाला. तो अपघात होता की घातपात असा प्रश्न राज यांना विचारण्यात आला. घातपात की अपघात यावर संशय आहे. मात्र घातपात आहे असं समजलं तरी ते बाहेर येणार आहे का?, असा प्रतिप्रश्न राज यांनी केला. या देशात प्रश्न उपस्थित होतात. पण त्यांची उत्तरं मिळत नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८१ वाढदिवस नुकताच साजरा झाला. त्याबद्दल बोलताना राज यांनी पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं. शरद पवारांनी वयाची ८१ वर्ष पूर्ण केली हे चांगलं आहे. हा सहस्रचंद्र दर्शन सोहळा आहे. देश गेली ६० वर्ष शरदचंद्र दर्शन करतोय. या वयातही ते राज्यात ज्या प्रकारे फिरतात ते कौतुकास्पद आहे. राजकीय मतभेद असतात.  मात्र चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे. ही आपली संस्कृती आहे, अशा शब्दांत राज यांनी पवारांवर स्तुतीसुमनं उधळली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेBJPभाजपाSharad Pawarशरद पवार