शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar : "राज्यातलं बदललेलं राजकीय वातावरण मला पसंत नाही," अजित पवारांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 09:39 IST

सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Ajit Pawar : सध्या राज्यातील एकूणच राजकीय परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. रविवारी रायगडमध्ये एका कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी संवाद साधताना विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी यावर भाष्य केलं. "सध्या जे काही सुरू आहे ते मला अजिबात पसंत नाही. ही आपली महाराष्ट्राची पद्धत नाही," असं ते म्हणाले.

"महाराष्ट्राची निर्मिती होऊन साठ वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा, वसंतराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख यांच्या काळात कशी पद्धत होती. विलासराव देशमुखांच्या मंत्रिमंडळात आम्ही आठ वर्ष काम केलं. तेव्हा गोपीनाथ मुंडे विरोधी पक्षाचे नेते आणि विलासराव देशमुख सत्ताधारी पक्षाचे नेते होते. त्यांच्या भाषणात एकमेकांना चिमटे काढले जात होते, परंतु खालच्या पातळीवर राजकारण कधीही झालं नाही. शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे यांचीही एकमेकांवर टीकाटिपण्णी व्हायची. परंतु त्यांचे मित्रत्वाचे संबंध अखेरपर्यंत राहिल्याचं आपण पाहिलं. तसं मात्र आताच्या काळात होताना दिसत नाही. हे दुर्देव आहे. जे चुकीचं बोलतायत अशा सर्वपक्षीय नेत्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. त्यात सुधारणा केली पाहिजे," असं अजित पवार म्हणाले."वादंगाची बातमी मध्यतरी एका वृत्तपत्रात आली होती. त्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. एका पक्षातही वाद असू शकतात. तीन पक्ष आणि अन्य छोटे पक्ष एकत्र येतात. अशात भांड्याला भांड लागल्यावर थोडा आवाज येतोच. परंतु कोणीही काही काळजी करण्याचं कारण नाही. चर्चेतून मार्ग निघू शकतो हे अनेकदा महाराष्ट्रानं दाखवून दिलं आहे. आम्हीही महाविकास आघाडीतील प्रमुख लोक ते दाखवून देऊ," असं विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण