शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही; अजित पवारांनी इतिहास सांगितला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 15:04 IST

I did not play politics of casteism and kinship; Ajit Pawar narrated the history २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता असं अजित पवार म्हणाले.

मुंबई  - मी जातीपातीचे, नात्यागोत्याचे राजकारण केले नाही. मी त्यात अडकलो नाही. कुणी कार्यकर्ता आला तरी त्याचे काम करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. सकाळी लवकर कामाला सुरूवात करतो. देशाचे पहिल्या नंबरचे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख झाली पाहिजे हे माझे स्वप्न आहे. ही वेळ राष्ट्रवादीवर का आली? मी राजकीय जीवनात काम करताना साहेबांच्या छत्रछायेखाली मी घडलोय, तयार झालोय यात तिळमात्र शंका नाही. प्रत्येकाचा काळ असतो. आपण साधारण वयाच्या २५ व्या वर्षापासून ७५ पर्यंत उत्तमरितीने काम करू शकतो असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

अजित पवार Ajit Pawar म्हणाले की, साहेबच आमचे दैवत आहेत. आज देश आणि राज्य पातळीवर राजकारण सुरू आहे. राजकीय पक्ष लोकांच्या हितासाठी काम करण्यासाठी स्थापन करतोय. संविधानाचा, देशहितासाठी, सर्व समाजातील घटकांना न्याय मिळावा. छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वप्न साकार करण्यासाठी आपण काम करतोय. पक्ष वाढला पाहिजे, खासदार, आमदारांची संख्या वाढली पाहिजे. नवीन कार्यकर्ते पुढे आले पाहिजे हे चक्र असले पाहिजे असं त्यांनी म्हटलं.

अजित पवारांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

पूलोद सरकारमध्ये जनसंघ होता, जो आता भाजपा आहे. १९८० मध्ये इंदिरा गांधी देशाच्या पंतप्रधान झाल्या. इतिहास पाहिला तर कुणी ना कुणी करिश्मा असणारे नेतृत्व लागते. लोकशाही आहे हे घडले आहे. जयप्रकाश नारायण यांचे ऐकून लोकांनी जनता पक्षाला निवडून दिले. करिश्मा असणारा नेता नसल्याने जनता पक्ष आता कुठेही नाही.

उत्साह, जोश, समाजासाठी काम करण्याची जिद्द असते. परंतु हे घडताना आम्हाला, जनतेला सांगितले की, १९८६ मध्ये समाजवादी काँग्रेस काँग्रेसमध्ये सामील झाली. त्यानंतर १९८८ मध्ये शरद पवारांना मुख्यमंत्रिपद दिले. ९१ ला राजकारण बदलले. मला बारामतीकरांनी खासदार केले. त्यावेळी राजीव गांधी आपल्यातून निघून गेले. एक लाट आली पी व्ही नरसिंहराव पंतप्रधान झाले. शरद पवार संरक्षणमंत्री झाले. ९५ मध्ये आपले सरकार गेले. भाजपा-शिवसेना युती सरकार आले. तो काळही आपण पाहिला.

१९९९ मध्ये सोनिया गांधी परदेशी आहेत हे आम्हाला सांगितले. परदेशी व्यक्ती देशाचा पंतप्रधान होऊ शकत नाही असं म्हटलं आपण ऐकले. १९९९ साली सगळ्यांनी पुढाकार घेतला राष्ट्रवादीची स्थापना झाली. ६ महिन्यात निवडणुका लागल्या. तेव्हा शिवाजी पार्क संपूर्ण मैदान गाजवण्याचे काम भुजबळांनी केले. नेत्यांच्या मार्गदर्शनासाठी काही तरी केले पाहिजे. सुजलाम सुफलाम महाराष्ट्र घडवला पाहिजे असं आम्हाला वाटले. पहिल्या टर्ममध्ये आम्हाला मंत्रिपदे दिली

राष्ट्रवादीच्या सगळ्यात जास्त जागा आल्यानंतर काँग्रेसने मुख्यमंत्रिपद पक्षाला देण्याची तयारी केली. पण ४ मंत्रिपदे जास्त घेऊन आलेली संधी गमावली. २००३ मध्ये ती संधी घेतली असती तर आजतागायत राज्यात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री राज्यात दिसला असता. आम्ही लोकांमध्ये मिसळलो, वडिलधाऱ्यांचा आदर केला. आमदारांनी काम करावे. विकास करावा. पालकमंत्र्यांनी जिल्ह्याला पुढे घेऊन जावे.

वैयक्तिक कुणाच्या स्वार्थासाठी हा निर्णय पक्षाने घेतला नाही. पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात अनेक विकासकामे रखडली आहे. काही कामांना स्थगिती मिळाली आहे ती उठवायची आहे. मी भेदभाव करत नाही. भाजपा, शिवसेना आमदारांनाही सांगतो. माझी प्रतिमा दबंग नेता आहे पण मी तसा नाही. मी सर्व समाजातील घटकांना सोबत घेऊन जाईन.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस