शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar: 'रिक्षात पुरुषाला बसवलं तर त्याचा फोटो काढा', अजितदादांच्या महिलांना सूचना
2
भारताचे जावई अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच सासरी आले; ट्रेड वॉरची भेट देणार की नेणार?
3
श्रेयस अय्यर, ईशानचं पुनरागमन, या तरुण चेहऱ्यांनाही संधी, बीसीसीआयचे वार्षिक करार जाहीर 
4
१ मे पासून पैसे काढणे आणि बॅलन्स तपासण्यासह 'या' गोष्टी महाग होणार, किती असणार शुल्क?
5
Ashwini Bidre: अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
6
४ रुग्णवाहिका, १० मृतदेह...एकाच कुटुंबातील ८ जणांच्या मृत्यूनं सगळ्यांचे डोळे पाणावले
7
IRCTC कडून ७ दिवसांची जपान टूर पॅकेज; कायकाय पाहायला मिळणार? किती असणार शुल्क?
8
'राम तेरी गंगा मैली' फेम मंदाकिनीला दाऊदपासून आहे मुलगा? दिल्लीच्या माजी कमिश्नर यांनी केलेला धक्कादायक खुलासा
9
BSNL चा धमाकेदार प्लान, ९०० रुपयांपेक्षा कमीत मिळतेय ६ महिन्यांची वैधता; बेनिफिट्सही आहेत खास
10
अवघं २ किलो वजन, १ हजार डिग्री तापमान, चीनने तयार केला अणुबॉम्बपेक्षा शक्तिशाली बॉम्ब, भारतासाठी धोक्याचा इशारा
11
आधी केस गळती, आता नखं गळती; पुण्यातील आरोग्य टीम बुलढाण्यात पोहोचली
12
मोठं होऊन काय व्हायचंय? आयुष म्हात्रेचा लहाणपणीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, नक्की बघा
13
I Killed Monster ! माजी DGP ची हत्या करून पत्नीनं मित्राला व्हिडिओ कॉल केला अन्...
14
सोन्याने म्युच्युअल फंडांनाही टाकलं मागे; आतापर्यंत २५% परतावा, किंमत १ लाख रुपयांच्या पुढे जाईल का?
15
भाच्याच्या प्रेमात वेडी झाली मामी, सौदीहून परतलेल्या पतीला संपवलं; मृतदेह बॅगेत भरला अन्...
16
'फॅण्ड्री'मधली शालू झाली ख्रिश्चन, राजेश्वरी खरातने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज
17
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
18
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
19
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा

तुम्ही कोणासोबत, शरद पवार की अजित पवार?; आमदार नरहरी झिरवाळांचा एका वाक्यात खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2024 16:12 IST

दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून बऱ्याच चर्चा सुरू आहेत. झिरवाळ हे शरद पवार गटात परतणार अशी चर्चा होती. त्यावर आज त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 

नाशिक  - मी माझी भूमिका स्पष्ट केलीय, मी त्याचा बाप, तळावर राहून मी जनतेची मनं जिंकली. शरद पवारांच्या कार्यक्रमात पोरगा फक्त सत्कार करायला गेला होता. माझा पोरगा अजून आज्ञाधारक आहे. त्याचा बाप डोकेबाज आहे. त्यामुळे तो लढायचं म्हणत असेल तर लढणार नाही गृहित धरा. माझा मुलगा कुठेही वावगं बोलला नाही. तो काय बोलला हे मी ऐकलं. मी जिथे आहे तिथेच आतापर्यंत आहे. त्यामुळे गद्दारीचा विषयच नाही. मी अजितदादांसोबत आधीही होतो आणि आजही आहे. लढायचा विषय आला तरी अजितदादांसोबतच अशी स्पष्ट भूमिका आमदार नरहरी झिरवाळ यांनी मांडली आहे.

नाशिक इथं राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. त्याला झिरवाळांनी हजेरी लावली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नरहरी झिरवाळ म्हणाले की, लोकसभेला आम्ही कुठेही कमी पडलो नाही. स्थानिक उमेदवार असतो तेव्हा सहानुभूतीचा उद्रेक होतो. मी अजितदादांसोबत गेलो आहे. मी नाराज नव्हतो. विधानसभेची तयारी सुरू आहे. पूर्वतयारी म्हणून अजित पवार प्रत्येक मतदारसंघात येणार आहेत असंही नरहरी झिरवाळ यांनी म्हटलं.

तसेच राजकारणात प्रत्येकाला मी काहीतरी केले पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. माझ्या मुलानं त्याचं भांडवल आधी उभं करावं. शरद पवार हे सर्वांचे दैवत आहे. राजकारणात ज्या घडामोडी होतात त्यात पसंतीक्रम असतो. त्या पसंतीक्रमात मी अजित पवारांसोबत आहे. पहाटेचा शपथविधी झाला तेव्हाही मी अजित पवारांसोबत होतो. यावेळी झाला तेव्हाही मी अजितदादांसोबत आहेत असं आमदार नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.

दरम्यान, त्याचा बाप अगदी ग्रामपंचायत सदस्यापासून इथवर पोहचलाय, माझ्याही पेक्षा मोठा व्हायचं असेल तर त्याने तिथूनच सुरूवात करतो. एकदम मोठं होणं त्यानंतर ५-१० वर्ष समजून घ्यायला जातात. जयंत पाटील इथं आले तेव्हा त्यांचा सत्कार करायला जाऊ का असं मुलाने म्हटलं तेव्हा ठीक आहे जा, सत्कार करून निघून ये असं मी म्हटलं होतं.  पण हा गेला की गेला, लगेच आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं होईल असं सांगत नरहरी झिरवाळांनी स्वत:च्या मुलाला कानपिचक्या दिल्या. काही दिवसांपूर्वी चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.  

टॅग्स :Narhari Jhariwalनरहरी झिरवाळAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस