शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

परमबीर सिंहांचा मोठा गौप्यस्फोट; "मी नार्को टेस्टला तयार, अनिल देशमुखांच्या बंगल्यात..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 17:17 IST

देवेंद्र फडणवीसांसोबत झालेल्या डीलनंतर परमबीर सिंह यांनी माझ्यावर आरोप केले असा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. त्यावर आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू मांडली आहे. 

मुंबई - एप्रिल २०२१ मध्ये अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलील देशमुख हे मला एट्रिया मॉलमधील स्टारबुक्समध्ये भेटले होते. त्यांनी मला हात जोडले, माझे पायही पडायला ते तयार होते. मला राज्याचा पोलीस महासंचालक बनवू. माझ्यावर जो अन्याय झाला त्याबद्दल खुद्द अनिल देशमुख माफी मागायला तयार आहेत असं सलील देशमुखांनी सांगितले होते असा गौप्यस्फोट मुंबई पोलीसचे माजी आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. 

अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आरोप प्रत्यारोपात आता परमबीर सिंह यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली आहे. परमबीर सिंह म्हणाले की, एक आयपीएस अधिकारी म्हणून मी पदाची प्रतिमा जपली, कधीही सार्वजनिकरित्या आरोप केले नाहीत. मात्र आज अनिल देशमुखांनी माझ्यावर जे गंभीर आरोप केलेत त्यावर मला प्रतिक्रिया देणं गरजेचे वाटले. एप्रिल २०२१ मध्ये संजय पांडे यांनी मला कार्यालयात बोलावून धमकी दिली होती. त्याआधी फोनवरही धमकी दिली होती. जर मी देशमुखांवर केलेले आरोप मागे घेतले नाहीत तर तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवलं जाईल आणि संपूर्ण सरकारच्या ताकदीचा सामना करावा लागेल. मी घाबरलो नाही. या सर्वांचे फोन रेकॉर्ड मी सीबीआयला दिलेत. सुप्रीम कोर्टातही ते सादर केलेत. मला धमकी दिली जात होती. गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात होता असंही परमबीर सिंह यांनी म्हटलं. एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या फोनवरील मुलाखतीत त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. 

तसेच मी जे सांगतोय, संजय पांडे यांनी धमकी दिली, अनिल देशमुख हे खोटे आरोप करतायेत, सलील देशमुख मला भेटले याबाबत मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. पण ती नार्को टेस्ट अनिल देशमुख, संजय पांडे, सलील देशमुख यांनीही दिली पाहिजे. अनिल देशमुख, सोनू जलान, रियाज भाटी यांची बंगल्यावर भेट झाली होती. जिथे संजय पांडेही हजर होते. तिथे माझ्याविरोधात कशारितीने गुन्हे दाखल करावेत याचं प्लॅनिंग केले. इतर गुन्हेगारांनाही अनिल देशमुख, संजय पांडे एकएक करून बोलावून माझ्याविरोधात कसे आरोप करायचे याचं गाईड करायचे. संजय पांडे मला धमकी देत होते त्याचे रेकॉर्डिंगही आहे. अनिल देशमुख, संजय पांडे नार्को टेस्ट करायला तयार असतील तर मीदेखील नार्को टेस्ट करेन. अनिल देशमुखांनी माझ्यावर तथ्यहिन आरोप लावलेत त्यावर मी काहीच बोलणार नाही असंही परमबीर सिंह यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सोनू जलान हा क्रिकेट बुकी असून अनिल देशमुखांच्या बंगल्यावर त्यांची बैठक झाली होती. रियाज भाटीने हायकोर्टाने याचिका केलीय त्यात अनिल देशमुखांसोबत फोटोही जोडला आहे. बंगल्यावर कोण कोण होते तेही सांगितले आहे. संजय पांडे यांनी त्यांना गाईड केले होते. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते. सुप्रीम कोर्टानेही या प्रकरणाची दखल घेत माझ्यावरील आरोपांची चौकशी राज्य सरकारकडून काढून सीबीआयकडे सोपवली. आता जे समोर आलंय ते १० टक्केच आहे. इतर जे अधिकारी आहेत, ज्यांच्याकडून या लोकांनी खंडणी घेतली ते समोर येण्याची हिंमत करत नाहीत. जर नार्को टेस्टसाठी ते तयार असतील तर मीही तयार आहे असं चॅलेंज परमबीर सिंह यांनी दिले. 

माझ्याविरोधात पुरावे असतील तर समोर आणावेत

मी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यांच्यासोबत डील झाली असा आरोप हे करतायेत. पण हे सरकारमध्ये होते, त्यांच्याकडे असे काही पुरावे असतील तर समोर आणावेत. माझी डील होती की नाही हे नार्को टेस्टमधून पुढे येईल. जर ते सत्य बोलत असतील तर त्यांनी नार्को टेस्टसाठी पुढे यावे जे सत्य असेल ते उघड होईल असं आव्हानही परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांना केले आहे. 

टॅग्स :Param Bir Singhपरम बीर सिंगAnil Deshmukhअनिल देशमुखDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSalil Deshmukhसलिल देशमुख