शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

Sadabhau Khot : 'केतकीचा मला अभिमान, कारण...', सदाभाऊ खोत यांच्याकडून समर्थन; नव्या वादाला तोंड फुटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 12:56 IST

I am proud of Ketki Chitale support from Sadabhau Khot A new controversy अभिनेत्री केतकी चितळे हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे.

उस्मानाबाद-

अभिनेत्री केतकी चितळे Ketki Chitale हिनं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार Sharad Pawar  यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे राज्यात वातावरण तापलेलं आहे. सर्व पक्षांकडून केतकीच्या पोस्टवर निषेध व्यक्त केला जात असताना आता सदाभाऊ खोत यांनी मात्र तिला समर्थन दिलेलं आहे. रयत क्रांती संघटनेनं केतकीनं केलेल्या पोस्टचं समर्थन केलं आहे. केतकी चितळेचा आम्हाला अभिमान आहे, असं वक्तव्य करत सदाभाऊ खोत Sadabhau Khot यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे. 

केतकी चितळेला मी ओळखत नाही : सुप्रिया सुळे

"केतकी कणखर आहे. तिला समर्थन करायला कुणाची गरज नाही. तिला मानावं लागेल. मला तिचा अभिमान आहे. न्यायालयात तिने स्वत:ची बाजू मांडली. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं. आता हे धंदे बंद करा. आमचा लढा प्रस्थापितांविरोधात आहे", असं सदाभाऊ खोत म्हणाले. उस्मानाबादमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

'तुका म्हणे' या शब्दाचा वापर करून विटंबनात्मक लेखन; केतकी चितळेच्या अडचणीत वाढ

"सरकार पुरस्कृत दहशतवाद राज्यात वाढवता कशाला? देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका करताना तुमची नैतिकता कुठे गेली होती? उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चंद्रकांत पाटील यांच्याबाबत वेगळा शब्द वापरुन टीका केली होती. त्यावेळी तुमची नैतिकता कुठे होती? अमोल मिटकरी ब्राह्मण समाजाला टार्गेट करतात त्यावेळी तुमच्या जिभेला हाड नव्हतं का? स्वत:वर टीका केली की सगळं आठवतं", असा जोरदार हल्लाबोल सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. 

सतत वादग्रस्त विधानं करणारी केतकी चितळे आहे कोण? आजवर काय काय बोलली..

जहांगीरदारांनी गुन्हा केला तर त्याला माफ करायचं आणि इतरांनी काही केलं तर गुन्हा दाखल करायचा. तुरुंगात डांबायचं. तिला मानावं लागेल. तिनं कोर्टात स्वत:ची बाजू मांडली. तिच्या पोस्टनंतर तुमच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या टीका-टिप्पणी एकदा पाहा. तुम्ही केलं तर पाटलांच्या पोरानं केलं आणि इतरांनी केलं तर कुणब्याच्या पोरानं केलं असहे हे धंदे आधी बंद करा, असंही सदाभाऊ खोत म्हणाले. 

केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांवर कारवाई करा- चित्रा वाघदुसरीकडे भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनीही केतकीला शिवीगाळ करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. केतकी चितळेच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावरही विविध प्रतिक्रिया उमटत आहे. याचपार्श्वभूमीवर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी एक ट्विट केलं आहे. तसेच या ट्विटमधून त्यांनी केतकी चितळेला सोशल मीडियावर शिवीगाळ करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करा, अशी मागणी केली आहे. "केतकी चितळे वर कारवाई झाली, आता त्याचबरोबर केतकी चितळेला अतिशय अश्लील भाषेत शिवीगाळ..उघड उघड चोपायची/ जीवे मारण्याची भाषा करणाऱ्या मर्दांवर आणि रणरागिणींवर देखील रितसर गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी", अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच  कायदा सर्वांना समान असतो, असं देखील चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Ketaki Chitaleकेतकी चितळेSadabhau Khotसदाभाउ खोत BJPभाजपाSharad Pawarशरद पवार