शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मला निवडणुकीसाठी 'घड्याळ' चिन्हाची चिंता नाही: शरद पवार असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 17:46 IST

सत्तेचा गैरवापर होतोय. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करून राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे अशा निशाणाही पवारांनी भाजपावर लावला.

छत्रपत्री संभाजीनगर –  शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीत दोन गट पडलेत. अजित पवारांनी सत्तेसोबत जाण्याचा निर्णय घेत शरद पवारांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी पक्षावरच दावा केला आहे. पक्ष आणि चिन्ह आमचेच आहे असं अजित पवार गटाने म्हटलं आहे. तर मला घड्याळ चिन्हाची चिंता नाही असं विधान शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

शरद पवार म्हणाले की, निवडणूक आयोगाचा निर्णय त्यांचा स्वत:चा असेल तर चिंता नाही. परंतु उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबतीत जो निर्णय झाला, त्यात केंद्र सरकारमधील शक्तिशाली घटकाचा त्यात हस्तक्षेप झाला आणि धनुष्यबाण चिन्ह, नावाचा निकाल आला. तोच प्रयोग आमच्या बाबतीत सुरू असल्याचे दिसते. पण याप्रकारच्या मागण्या निवडणूक आयोगाकडे केलेल्या आहेत. त्याचा खुलासा आमच्याकडे आयोगाने मागितला. ते बघितल्यानंतर निश्चित आम्हाला काळजी वाटते असं त्यांनी सांगितले.

परंतु व्यक्तिश: मला चिन्हाची चिंता नाही. माझ्या आयुष्यात मी १४ निवडणूक लढवल्या. सुदैवाने प्रत्येक निवडणूक मला जनतेने विजयी केले. १९६७ साली मी पहिली निवडणूक लढलो तेव्हा माझं चिन्ह बैलजोडी होते. त्यानंतर चरखा, गाय-वासरु, हात अशा चिन्हांवर मी लढलो. आणि शेवटची निवडणूक मी लढलो ते चिन्ह घड्याळ होते. आज इतक्या चिन्हे असताना आम्ही निवडणूक जिंकलो. त्यामुळे मला चिन्हाची चिंता नाही. पण सत्तेचा गैरवापर होतोय. केंद्रातील अधिकाराचा गैरवापर करून राजकीय पक्ष, शक्ती कशी अडचणीत आणता येईल हे त्यांचे धोरण आहे अशा निशाणाही पवारांनी भाजपावर लावला.

दरम्यान, ज्यावेळी आपल्याला यश मिळणार नाही याची खात्री पटते तेव्हा माणूस या मार्गाला जातो. मला सध्या देशातील चित्र मोदी सरकारला अनुकूल दिसत नाही. हिंदुस्तानाचा नकाशा पाहिला तर केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पंजाब, दिल्ली, पश्चिम बंगाल तिथे भाजपा सरकार नाही. मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गोवा इथली सरकारे पाडून भाजपा सत्तेत आले. निवडणुकीपूर्वी भाजपाची विल्हेवाट कशी लावायची याचा विचार जनतेने केलाय. त्यामुळे मी पुन्हा येईल असं कितीही म्हटलं तरी त्यांची स्थिती देवेंद्रसारखी होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असंही शरद पवारांनी सांगितले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAjit Pawarअजित पवार