शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेच्या मनात काय चाललंय, हे सांगायला मी ज्योतिषी नाही! राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आव्हाडांचा टोला  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2022 07:31 IST

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी  खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते.

कल्याण : आघाडी धर्म पाळणे हे ज्याच्या त्याच्या मनावर आहे. आम्ही आघाडी धर्म पाळतो. त्यांच्या मनात काय चाललं आहे, हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेना नेत्यांना शनिवारी लगावला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास माजी  खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे आदी उपस्थित होते. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या मेळाव्यात ताकदीने कामाला लागा, असे आवाहन आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना केले. कल्याण-डोंबिवलीचा विकास झाला आहे का, या प्रश्नावर आव्हाड म्हणाले की, कल्याण-डोंबिवलीचा विकास हरवला आहे. मला तरी दिसला नाही. भाजपच्या विकास म्हात्रेंचे घर सोडून बाकी कुठेही विकास झालेला नाही, अशी टीका त्यांनी केली. एमआयडीसीतील कारखाने स्थलांतरित झाल्याने कामगारांचा रोजगार जाणार असल्यास त्याला माझा विरोध असल्याचे आव्हाड म्हणाले. माजी शिवसेना आमदार सुभाष भोईर यांच्या सोबत गुप्त बैठक झाली. याविषयी ते म्हणाले की, माझे नाव जितेंद्र आव्हाड आहे. बंद खोलीत चर्चा करीत नाही. मी भोईर यांच्या घरी गणेश दर्शनाकरिता गेलो होतो. जे काही करतो ते उघडपणे करतो. शेतकरी मारहाण प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव होता, हे राजू पाटील यांना विचारा.

कर्नाटक सरकार कोण? -हिजाबच्या मुद्दयावरून आव्हाड म्हणाले की, कोणी काेणता पेहराव करावा, हे ठरविणारे कर्नाटक सरकार कोण? केंद्राने मिनिस्टर फॉर ड्रेस डिझायनिंग नेमावा त्यानंतर हे प्रश्न सुटू शकतील. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना