शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटलांना मी हिमालयात सोडायला जातो, जयंत पाटील यांचा उपराेधिक टोला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 07:01 IST

येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे.

सातारा : भाजपचे नेते बोलतात तसे वागत नाहीत. चंद्रकांतदादा तर भाजपचे सोयीचे अध्यक्ष वाटतात. कोल्हापुरातील निवडणुकीवरून हिमालयात जाणार, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे हिमालयात ते जाणार असतील तर इथंही उकाडा आहे. त्यामुळे त्यांना सोडायला मी जातो, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला. यावेळी राज ठाकरेंनी केलेल्या टीकेवर त्यांनी नकलाकाराकडून काय अपेक्षा करणार, असा प्रहारही केला.येथे पत्रकार परिषदेत पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसची परिवार संवाद यात्रा आतापर्यंत राज्यातील २३० विधानसभा मतदारसंघांतून आली आहे. २३ एप्रिलला कोल्हापुरात या यात्रेचा समारोप होत आहे. राज्यात या यात्रेला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तरीही यामधून बरीच सुधारणा करावी लागेल, असेही दिसून आले आहे.राज्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे आरोप आणि अल्टिमेटम देणे सुरू आहे, तसेच त्यांनी आपल्यावरही टीका केली होती, याबाबत आपली भूमिका काय? या प्रश्नावर ते म्हणाले, राज ठाकरे सर्वांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. ते कोणाच्या तरी हातचे बाहुले झाले आहेत, हे आता सर्वांना माहीत झाले आहे. अशा नकलाकारांच्या कलेचं कौतुकच केलं पाहिजे. भोंगे बंद करण्याचा विषय ते मांडतात. यापेक्षा त्यांनी गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशमध्ये जावे. त्या ठिकाणी भोंगे बंद झाले का, हे तपासावे. त्याप्रमाणे आम्हालाही सांगावे. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा