शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

"मी डबा, उद्धव ठाकरे माझं इंजिन; I Love U म्हणायचं अन् लफडी करायची हे चालतंच"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 18:37 IST

मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे असं भाष्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाविकास आघाडीतील नाराजीवर केले आहे.

सांगली - राज्यसभेच्या निकालानंतर महाविकास आघाडी किंबहुना शिवसेनेला मोठा धक्का बसला. या निवडणुकीत शिवसेनेने उभा केलेला दुसरा उमेदवार संजय पवार यांना पराभव सहन करावा लागला. तर संख्याबळ नसतानाही भाजपाला ३ जागा निवडून आणण्यात यश आले. त्यानंतर महाविकास आघाडीत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. मविआत फूट पडली अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यावर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. 

गुलाबराव पाटील म्हणाले की, मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहे. तीन पक्ष म्हटल्यावर एवढे होणारच आहे. ते आमची खेचणार, आम्ही त्यांची खेचणार हे चालणारच आहे. ते त्यांच्या पक्षाचा विचार करतात मी माझ्या पक्षाचा विचार करेन. ज्या पक्षाचा मी मंत्री त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विचार करणं माझे काम आहे असं त्यांनी सांगितले. तर महाविकास आघाडीत फूट पडेल का या पत्रकारांच्या प्रश्नावर त्यांनी सांगितले की, भाजपा-शिवसेनेचीही खेचाखेची व्हायची. आय लव्ह यू म्हणायचं नंतर लफडी करायची हे चालतेच आहे. मी डबा आहे आणि उद्धव ठाकरे माझे इंजिन आहेत. तुम जहा कहोगे, मै वहा जाऊंगा असं विधान त्यांनी केले.

शिवसेनेचा आमदार फुटला नाही राज्यसभेची एक जागा निवडून आली म्हणजे गावातील पैलवान निवडून आलाय असं चाललं आहे. शिवसेनेचा एकही आमदार फुटला नाही. अपक्ष आमदारांनी मते वेगळी दिली. शिवसेनेच्या आमदारांनी मते दुसरीकडे दिली असती तर मुख्यमंत्र्यांचा अपयश म्हणता येते. निवडणुकीत हार-पराजय होत असतो. एका खासदाराची जागा आली नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या चर्चेच्या गोष्टी आहेत असं गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच संजय राऊतांनी जे विधान केले त्यांच्यावर काही बोलू शकतो. महाविकास आघाडीत फूट पडो की काहीही होवो मला फरक पडत नाही. मी शिवसेनेचा आहे. मी डबा आहे माझ्या इंजिनाकडे बघतो. यश-अपयश सुरू असतं असंही त्यांनी म्हटलं.   

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना