महिलांचे लैंगिक शोषण केल्या प्रकरणी अटकेची कारवाई झालेला स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याची सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. तसेच पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीमधून खरात याचे एकापाठोपाठ एक कारनामे समोर येत आहेत. दरम्यान, हा खरात महिलांना आपल्या जाळ्यात कसा ओढायचा याची माहितीही या चौकशीमधून समोर आली आहे.
ज्योतिषी असल्याची बतावणी करणाऱ्या अशोक खरात याचे अनेक राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रात अनुयायी आहेत. त्याबरोबरच त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या अनेक महिलांनाही खरात याने जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याची बाब समोर आली आहे. अशोक खरात हा त्याल्या भेटायला येणाऱ्या महिलेला पेढा आणि खारट-कडवट अशी विशिष्ट्य चव असलेलं पाणी प्यायला द्यायचा. मग त्या महिलेच्या डोक्यावर कलश देऊन कानाजवळ पुटपुटायचा. मी कृष्णाचा अवतार असून तू माझी गेल्या जन्मातील राधा आहेस’, असे सांगून त्या महिलेसा वश करायचा आणि तिचं शारीरिक शोषण करायचा, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, शेकडो महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात याचे कारनामे एका पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आले. तसेच पोलिसांनी १८ मार्च २०२६ रोजी त्याला अटक केली. अशोक खरात याने आपल्याला गुंगीचं औषध देऊन आपल्यावर अत्याचार केल्याचा आरोप पीडित महिलेने तक्रारीमधून केला होता. एवढंच नाही तर पोलिसांना अशोक खरात याचे अनेक महिलांसोबतचे आक्षेपार्ह व्हिडीओ सापडले आहेत. तसेच अशोक खरात याचे व्हिडीओ लिक करण्यामधील सूत्रधार हा ऑफिसबॉय नीरज जाधव असल्याचे समोर आले. अशोक खरातने अनेक महिलांचे केबीनमध्येच शोषण केले, याचे सीसीटीव्ही फुटेज लिक करुन ५८ व्हिडीओ विकण्याचा प्लान केला होता.
Web Summary : Astrologer Ashok Kharat, arrested for sexually abusing women, lured them by claiming to be Krishna and exploiting them physically. He offered a special drink, whispered in their ears, and took advantage of them. A victim's complaint revealed his crimes, leading to his arrest and the discovery of incriminating videos.
Web Summary : ज्योतिषी अशोक खरात महिलाओं का यौन शोषण करने के आरोप में गिरफ्तार। उसने खुद को कृष्ण बताकर महिलाओं को फंसाया और उनका शारीरिक शोषण किया। वह विशेष पेय पिलाता था, कान में फुसफुसाता था, और फायदा उठाता था। एक पीड़िता की शिकायत के बाद उसकी गिरफ्तारी हुई और आपत्तिजनक वीडियो मिले।