शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
2
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
3
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
4
भयंकर! बॉयफ्रेंडसाठी नवऱ्यासह मुलाला सोडलं, 'त्याने'च तिला संपवलं, अंगावर काटा आणणारी घटना
5
"विवाहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
6
महालक्ष्मी रेसकोर्सवर साकारणार भव्यदिव्य सेंट्रल पार्क; आराखड्याचे महापालिकेकडून सादरीकरण
7
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
8
रेखा झुनझुनवालांकडे या कंपनीचे तब्बल ५ कोटींहून अधिक शेअर; ₹३०० पार जाणार स्टॉक, एक्सपर्ट्सचा दावा
9
Photo: 'या' वर्षातील बेस्ट बजेट स्मार्टफोन, किंमत १५ हजारांपेक्षा कमी, यादीत मोठे ब्रँड्स
10
Wedding Ritual: लग्नाआधीची विचित्र प्रथा, वरच्या कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी वधूला करावं लागतं 'हे' काम
11
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
12
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
13
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
14
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
15
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
16
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
17
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
18
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
19
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
20
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

'मी CBI अधिकारी बोलतोय...', वृद्ध महिला दोन महिने डिजिटल अरेस्ट, 20 कोटी रुपये लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 20:45 IST

मुंबईतील 86 वर्षीय वृद्ध महिलेला डिजिटल अरेस्ट करुन कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे.

Digital Arrest : गेल्या काही काळापासून 'डिजिटल अरेस्ट'द्वारे फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. केंद्र सरकारकडून सातत्याने यासंदर्भात नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला जातोय. दरम्यान, मुंबईतून अशाप्रकारचे प्रकरण समोर आले आहे. एका 86 वर्षीय महिला दोन महिने डिजिटल अरेस्टमध्ये ठेवून 20 कोटी रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 'सीबीआय' अधिकारी असल्याचे भासवत 26 डिसेंबर 2024 ते 3 मार्च 2025 दरम्यान महिलेची फसवणूक केली. 

दर 3 तासांनी लोकेशन तपासायचेया महिन्याच्या सुरुवातीला महिलेने नोंदवलेल्या पोलिस तक्रारीनुसार, तिला सीबीआय अधिकारी असल्याचे भासवले आणि तिच्या 'आधार' कार्डद्वारे बँक खाते उघडून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा दावा करण्यात आळा. आरोपीने वृद्ध महिलेला दोन महिने घरी राहण्यास भाग पाडले आणि दर तीन तासांनी फोन करुन तिचे ठिकाण जाणून घ्यायचे. ज्या बँक खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात आले होते, त्यांची ओळख पटवून सायबर पोलिसांनी महिलेचे 77 लाख रुपये वाचवले, मात्र तोपर्यंत आरोपींनी महिलेकडून कोट्यवधी रुपये लाटले होते. 

सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असून, महिलेला घरातच राहण्यास भाग पाडले. तिच्या कुटुंबीयांनाही अटक करण्याची धमकी दिली. 26 डिसेंबर ते 3 मार्च या कालावधीत वृद्ध महिलेने 20 कोटींहून अधिक रक्कम आरोपींना हस्तांतरित केली. हा भारतातील सर्वात मोठा डिजिटल अटक घोटाळा असल्याचे बोलले जात आहे. दोन महिन्यांनंतर महिलेच्या घरी काम करणाऱ्या नोकराने तिच्या मुलीला वागण्यात झालेल्या बदलाची माहिती दिली आणि त्यानंतर या घटनेचा उलगडा झाला.

याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. यातील एक आरोपी आंतरराष्ट्रीय टोळीचा भाग आहे. आरोपींनी टेलिग्राम ॲपवर एक ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये अशा भारतीय खात्यांचे तपशील शेअर केले जात होते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे ठेवले जातात. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

 

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमMumbaiमुंबईPoliceपोलिस