मी सुद्धा त्या 'क्लिप्स' पाहतो- गिरीश बापटांची जीभ घसरली

By Admin | Updated: September 11, 2015 18:17 IST2015-09-11T17:27:52+5:302015-09-11T18:17:44+5:30

विद्यार्थी हक्क परिषेदतील भाषणादरम्यान 'मीही रात्री तसल्या क्लिप्स बघतो' असे आक्षेपार्ह वक्तव्य बापट यांनी केले.

I also see those 'clips' - Girish Bapat's tongue dropped | मी सुद्धा त्या 'क्लिप्स' पाहतो- गिरीश बापटांची जीभ घसरली

मी सुद्धा त्या 'क्लिप्स' पाहतो- गिरीश बापटांची जीभ घसरली

>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ११ - अश्लील वेबसाईट्सवर बंदी घालण्याच्या सरकारच्या निर्णयावरून झालेला वादंग ताजा असतानाच पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलेल्या एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.  विद्यार्थी हक्क परिषेदतील भाषणादरम्यान बापट यांची जीभ घसरली आणि  ' तुम्ही रात्री ज्या क्लिप्स बघता त्या आम्हीही बघतो' असे आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी शेकडो विद्यार्थ्यांसमोर केले. 
एमपीएससी व स्पर्धा परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा ४० करावी आणि आयपीएस सेवेसाठीची वयोमर्यादा २८ वरून ३३ करण्यात यावी अशी मागणी करत महायुतीच्या घटकपक्षांनी पुण्यात  विद्यार्थी हक्क परिषद भरवण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बापट यांची जीभ घसरली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, शिवसंग्रामचे विनायक मेटे आदी नेते उपस्थि होते.
' तुम्ही रात्री कोणत्या क्लिप्स पाहता ते मला माहित आहे, कारण तुम्ही काय बघता ते मीही बघत असतो. आम्ही म्हातारे झालो असं समजू नका ' असे वक्तव्य बापट यांनी विद्यार्थ्यांसमोर केलं. बापटांच्या या वक्तव्यामुळे स्टेजवर बसलेले महायुतीचे अन्य नेते गडबडले.
मात्र आपला तसं काही म्हणण्याचा उद्देश नव्हता उलट मी विद्यार्थ्यांना तसलं काही न बघण्याबाबत समजवत होतो, असे सांगत बापट यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 

Web Title: I also see those 'clips' - Girish Bapat's tongue dropped