शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

हुश्श! मान्सूनची मुंबई, कोकणातून माघार; चला 'हुडहुडी'च्या तयारीला लागा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 09:26 IST

आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : जून ते सप्टेंबरदरम्यान कमी वेळात जास्त पडून मुंबईची तुंबई करणाऱ्या मान्सूनने शुक्रवारी मुंबापुरीतून माघार घेतली. याबाबतची घोषणा भारतीय हवामान शास्त्र विभागाने केली.

‘सतर्क’कडील सविस्तर माहितीनुसार, मान्सून शुक्रवारी मुंबईसह उत्तर कोकणसह अन्य भागातून मान्सून माघारी फिरला आहे. आता मान्सूनच्या परतीची सीमा अलिबाग, अकोला, जबलपूर, वाराणसीतून जात आहे. राज्याच्या उर्वरित भागातून मान्सून पुढील तीन ते चार दिवसांत माघारी जाणार असल्याची माहिती ‘सतर्क’ने जारी केली आहे. 

दिवाळीत पाऊस पडेल की नाही? याचे संकेत पुढील आठवड्यात मिळतील, तर मान्सूनने माघार घेतली असतानाच शुक्रवारी दक्षिण व दक्षिण मध्य मुंबईतील परिसर अंधूक झाल्याचे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले. 

धुळीमुळे हवामान अंधूकसमुद्राहून जमिनीकडे म्हणजे मुंबईकडे वाहणारे वारे थांबले आहेत. वाऱ्याची दिशा बदलली आहे. उत्तर आणि उत्तर पश्चिम दिशेकडून खाली मुंबईकडे संथ गतीने वारे वाहत आहेत. वाऱ्याचा वेग कमी असतानाच हवेतील धूळ, मातीचे हलके कण हवेत तरंगू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून हवामान अंधूक असून, येथील हवेची गुणवत्ता मध्यम स्वरूपाची असल्याचेही हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai Monsoon Retreats; Prepare for Winter Chill!

Web Summary : Mumbai's monsoon has withdrawn, the weather department announced. The retreat extends from Alibaug to Varanasi. The remaining state will see withdrawal in 3-4 days. Dust causes hazy conditions, impacting air quality. Expect Diwali rain indications next week.
टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस