चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

By Admin | Updated: June 7, 2016 16:50 IST2016-06-07T16:14:39+5:302016-06-07T16:50:38+5:30

तालुक्यातील वांगणी येथील एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन केल्याची घटना घडली असून संशयीत पती फरार झाला आहे तर हया हृदयद्रावक घटनेची आठ वर्षाची मुलगी

Husband's wife murdered on suspicion of character | चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

चारित्र्याच्या संशयावरून पतीने केला पत्नीचा खून

ऑनलाइन लोकमत

पेठ (नाशिक), दि. ७ -  तालुक्यातील वांगणी येथील एका पतीने चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खुन केल्याची घटना घडली असून संशयीत पती फरार झाला आहे. तर या हृदयद्रावक घटनेची आठ वर्षाची मुलगी प्रत्यक्षदर्शी ठरली आहे.
   वांगणी येथील बाबुराव प्रधान हा पत्नी व मुलीसह वांगणी शिवारात शेतातील झापावर राहतो. पत्नी वनिता बाबुराव प्रधान वय- 35 हिचेवर तो नेहमी चारित्रया विषयी संशय घेत असे. या कारणावरून त्यांच्यात कौटूबिक कलह निर्माण झाले होते. याच कारणावरून त्यांच्यात झालेल्या वादात पती बाबुराव याने लाकडी दांडक्याने पत्नी वनितास जबर मारहाण केली . यामध्ये डोक्याला मार लागल्याने वनिता बेशुध्द पडली. या प्रकाराने भयभीत झालेल्या पतीने घटनास्थळावरून पळ काढला.
    हा सारा प्रकार घरातच असलेल्या आठ वर्षाच्या चिमूकलीने बघितला. भयभीत अवस्थेत तिने धावत येऊन गाव गाठले. झालेला प्रकार नागरिकांना सांगितला.परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली असता वनिता निपचित पडल्याचे दिसून आले. वांगणीचे हिरामण बठाले यांनी पेठ पोलीसांना खबर दिली. पोलीसांनी वनिता हिस पेठच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. याबाबत पेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरिक्षक विजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उनिरिक्षक मुंढे फरार संशयीत पतीचा शोध घेत आहेत.

Web Title: Husband's wife murdered on suspicion of character