पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढ

By Admin | Updated: July 4, 2016 20:10 IST2016-07-04T20:10:43+5:302016-07-04T20:10:43+5:30

पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटवरून मृत्युचे गूढ उकलले. याप्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Husband's suicide The mysterious mystery | पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढ

पतीची आत्महत्या; मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढ

पतीची आत्महत्या, पत्नी, तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हा
डहाणे नगरातील घटना : मृत्यूपूर्व चिठ्ठीने उकलले गूढ
अमरावती : पतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईट नोटवरून मृत्युचे गूढ उकलले. याप्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलाविरुद्ध गुन्हा नोंदविला. ही घटना यशोदा नगराजवळील डहाणे नगरात २९ जून रोजी घडली. रविवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात रविवारी दाखल करण्यात आली आहे.

डहाणे नगरातील रहिवासी योगेश देवीदास वानखडे (३६) यांनी २९ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणात फे्रजरपुरा पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद करून चौकशी सुरू केली होती. चौकशीत मृताने मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली. त्यामध्ये योगेशला त्यांची पत्नी, तिच्या आई-वडिलांनी असभ्य वागणूक देऊन मानसिक छळ केल्याचे नमूद आहे. त्यानुसार योगेश वानखडेच्या मृत्यूला पत्नी, सासू व सासरे कारणीभूत असल्याचे पोलीस चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार मृताच्या आईने रविवारी फे्रजरपुरा पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने पती, सासु व सासऱ्याविरुध्द भादंविच्या कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक अनंत चिमोटे करीत आहेत.

 

Web Title: Husband's suicide The mysterious mystery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.