हुंड्यासाठी पतीची हत्या!

By Admin | Updated: March 20, 2016 02:24 IST2016-03-20T02:24:32+5:302016-03-20T02:24:32+5:30

हुंड्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरून एका विवाहितेने तिच्या पतीची हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कौठा शिवारात घडली. पोलिसांनी विवाहितेसह

Husband kidnapped husband! | हुंड्यासाठी पतीची हत्या!

हुंड्यासाठी पतीची हत्या!

श्रीगोंदा (अहमदनगर) : हुंड्याचे पैसे न दिल्याच्या कारणावरून एका विवाहितेने तिच्या पतीची हत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील कौठा शिवारात घडली. पोलिसांनी विवाहितेसह तिच्या नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सर्व आरोपी फरार झाले आहेत़
करिश्मा हिचा विवाह बादल बक्या काळे (२०, रा. कौठा, ता. श्रीगोंदा) याच्याशी गेल्या वर्षी झाला होता़
हा विवाह ठरविताना बादल याने करिश्माच्या आई-वडिलांना ५० हजार रुपये हुंडा देण्याचे ठरले होते़ मात्र, लग्नाला वर्ष झाले तरी हुंड्याची पूर्ण रक्कम करिश्माच्या आई-वडिलांना मिळाली नव्हती़ बादल याने हुंड्याचे २० हजार रुपये थकविल्याने ती रागावली होती.
करिश्मा हिने ताज्या भोसले, अमोल भोसले, गणेश काळे, अभिमान काळे या नातेवाइकांच्या मदतीने शुक्रवारी दुपारी तिचा पती बादल यास झाडाच्या फांदीवर बांधलेल्या फासावर लटकवले़
ही घटना बादलची नातेवाईक गयाबाई पवार यांना समजली़ त्यांनी रात्री उशिरा श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करिश्मासह तिच्या नातेवाइकांविरोधात फिर्याद दिली, अशी माहिती पोलीस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Husband kidnapped husband!