शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शेकडो कुटुंबांनी केले स्थलांतर

By admin | Updated: August 6, 2016 00:28 IST

खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार.

पुणे : खडकवासला धरणातून दुपारपासून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे. शुक्रवारी रात्री आठपासून ४२ हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात येणार. पुन्हा सिंहगड रस्ता, पाटील इस्टेट झोपडपट्टी, रजपूत झोपडपट्टी, मंगळवार पेठ, कामगार पुतळा झोपडपट्टी आदी ठिकाणच्या शेकडो कुटुंबीयांना स्थलांतर करावे लागले आहे. नदीकाठच्या परिसरात आपत्ती व्यवस्थापन विभागाची गाडी रात्रभर गस्त घालत होती.दोन दिवसांपूर्वी खडकवासला धरणातून पाणी सोडल्यानंतर सिंहगड रस्ता परिसरातील सोसायट्यांसह नदीकाठच्या झोपडपट्ट्यांमधील अनेक कुटुंबे शाळा, मंगल कार्यालयांमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. त्यानंतर पावसाचा जोर कमी झाल्याने पाणी ओसरल्यावर पुन्हा ही कुटुंबे घरी परतली. गुरुवारी रात्रीपासून पावसाने पुन्हा जोर धरला. शुक्रवारी दिवसभर धरणक्षेत्रांत जोरदार पाऊस कोसळल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये ८६ टक्के इतका पाणीसाठा झाला आहे. पानशेत धरणातून खडकवासाला धरणाच पाणी सोडण्यास सुरुवात झाल्याने परिस्थिती आणखीच गंभीर झाली आहे. या पार्श्वभूमीवर, महापालिका प्रशासनाकडून दक्षता घेण्यास सुरुवात झाली आहे. अग्निशामक दल, पोलीस व महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षातील कर्मचारी नदीकाठच्या परिसरात तैनात करण्यात आले. झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता असलेल्या कुटुंबांना शाळांमध्ये स्थलांतरित केले. त्यांची तिथे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. रजपूत झोपडपट्टीच्या राजीव गांधी वसाहतीमधील ६ कुटुंबांना व पुलाची वाडी येथील १६ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले.(प्रतिनिधी)>स्थलांतरांचा प्रश्न लालफितीत...मंगळवार पेठेतील जुन्या बाजाराच्या मागील झोपडपट्टीमधील नदीकाठच्या ४०० कुटुंबांना सातत्याने बाधित व्हावे लागत असल्याने त्यांना हडपसर येथील महापालिकेच्या घरांमध्ये बीएसयूपीअंतर्गत स्थलांतर करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. नागरिकांनीही तिथे जाण्याची तयारी दर्शविली आहे; मात्र महापालिका प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे त्या नागरिकांचे अद्याप स्थलांतर होऊ शकलेले नाही. ऐन पावसाळ्यात नदीचे पाणी शिरून कुटुंबांना विस्थापित व्हावे लागत असल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त केली जात होती. या कुटुंबांचे तातडीने बीएसयूपी योजनेअंतर्गत प्रशासनाकडून स्थलांतर केले जावे, अशी मागणी स्थानिक नगरसेवक अजय तायडे यांनी केली.