डॉक्टर-रु ग्ण यांच्यात हवी मानवतेची किनार

By Admin | Updated: June 30, 2014 00:44 IST2014-06-30T00:44:15+5:302014-06-30T00:44:15+5:30

रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रति सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टर आणि रु ग्ण यांच्यातील संबंधांना मानवतेची किनार हवी आहे.

Humanity's edge is needed by Doctor-Ru Gun | डॉक्टर-रु ग्ण यांच्यात हवी मानवतेची किनार

डॉक्टर-रु ग्ण यांच्यात हवी मानवतेची किनार

‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ पदग्रहण सोहळा
नागपूर : रोग्याचे दु:ख निवारण करणे हे जसे डॉक्टरचे कर्तव्य असते, तसे त्यांच्याप्रति सहृदय संवेदना व्यक्त करणे, हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे. डॉक्टर आणि रु ग्ण यांच्यातील संबंधांना मानवतेची किनार हवी आहे. यासाठी डॉक्टर-रु ग्ण संवाद वाढायला हवा. रु ग्णांनीही अधिक मनमोकळेपणाने डॉक्टरांसमोर आपल्या समस्या मांडायला हव्यात, असे प्रतिपादन महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. किशोर टावरी यांनी येथे केले.
‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ पदग्रहण सोहळा रविवारी मोठ्या थाटात पार पडला. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाला प्रसिद्ध अभिनेता डॉ. अशोक खुराना उपस्थित होते.
डॉ. टावरी म्हणाले, जुन्या काळातील आव्हाने आता बदलली आहेत. समाज सदन, सक्षम आणि शिक्षित झालेला आहे. त्यामुळे डॉक्टरांची जबाबदारी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, ‘कट प्रॅक्टिस’मुळे डॉक्टरांची प्रतिमा डागळली जात आहे. यामुळे ‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’सारख्या सर्व जबाबदार संस्थांनी याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. वैद्यकशास्त्र दिवसेंदिवस अत्याधुनिक होत आहे. याचे फायदा जर सर्वांना हवा असेल तर डॉक्टर-रुग्ण यात संवाद वाढणे आवश्यक आहे.
-भावनिक बंध क्षीण होत आहेत
डॉ. खुराना म्हणाले, डॉक्टर समाजातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे. त्यांच्या अविरत आणि महत्त्वपूर्ण कार्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. मात्र, बदलत्या काळात सर्वच भावनिक बंध क्षीण होत आहेत. हीच गोष्ट दुर्दैवाने डॉक्टरी पेशातसुद्धा आली आहे. त्यामुळे डॉक्टरांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत सर्व संस्थांनी एकत्र येऊन यावर काम करणे आवश्यक आहे.
- ‘एएमएफ’च्या अध्यक्षपदी डॉ. गोपाल अरोरा
‘असोसिएशन आॅफ मेडिकल फॅकल्टीस्’ची (एएमएफ) नवी कार्यकारिणी आज घोषित करण्यात आली. डॉ. गोपाल अरोरा यांनी अध्यक्षपदाची तर डॉ. विनोद सुखीजा यांनी सचिव पदाचा पदभार सांभळाला. प्रेसिडेंट इलेक्ट म्हणून डॉ. गौरी अरोरा, उपाध्यक्ष डॉ. टी. एस. उबेरॉय आणि डॉ. युनस शाह, सहसचिव डॉ. अजय देशपांडे आणि डॉ. अन्ने विल्कीसन, उपाध्यक्ष डॉ. ग्रीष्मा धिंग्रा आदींची निवड करण्यात आली.
-विविध विषयांवर कार्यशाळा
पदग्रहण सोहळ्यानंतर विविध विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ‘लेटेस्ट टेक्नालॉजीस् इन कॅटरॅक्ट मॅनेजमेन्ट’ या विषयावर प्रसिद्ध नेत्रराग रोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत अग्निहोत्री, ‘ब्लड सेफ्टी’ या विषयावर लाईफ लाईन ब्लड बँकेचे संचालक डॉ. हरीश वरभे तर डॉ. प्रमोद गांधी यांनी ‘मधुमेह‘ या विषयावर मार्गदर्शन केले. यावेळी दोनशेच्यावर डॉक्टर सहभागी झाले होते. कार्यक्रमाला डॉ. अरुण गाडे, डॉ. जयंत कोले, डॉ. शंकर खोब्रागडे, डॉ. इकबाल खान, डॉ. संजय जैन आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Humanity's edge is needed by Doctor-Ru Gun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.