माणुसकी मेली!

By Admin | Updated: May 13, 2017 02:12 IST2017-05-13T02:12:39+5:302017-05-13T02:12:39+5:30

अपघातानंतर दोन दुचाकींनी पेट घेतला आणि त्यात दोघेही दुचाकीस्वार होरपळू लागले. त्यांना मदत करण्याऐवजी काही प्रत्यक्षदर्शी फोटो काढण्यात

Humanity is dead! | माणुसकी मेली!

माणुसकी मेली!

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अपघातानंतर दोन दुचाकींनी पेट घेतला आणि त्यात दोघेही दुचाकीस्वार होरपळू लागले. त्यांना मदत करण्याऐवजी काही प्रत्यक्षदर्शी फोटो काढण्यात आणि व्हिडिओ शूटिंग करत असल्याचा प्रकार घटनेच्या दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गुरुवारी सायंकाळी माजलगावकडून अवैध दारू घेऊन जाणाऱ्या दुचाकीची परभणीकडून येणाऱ्या दुचाकीशी घळाटवाडी फाट्यावर टक्कर झाली. त्यात दारूच्या बाटल्यांचा स्फोट होऊन दोन्ही दुचाकींनी पेट घेतला. दुचाकीखाली अडकलेल्या व्यक्तीचा होरपळून जागीच मृत्यू झाला. त्याची ओळख दुसऱ्या दिवशीपर्यंत पटली नव्हती. तर, दुसरा दुचाकीस्वार नितीन अजयकुमार जैस्वाल (२२, रा. माजलगाव) ७० टक्के भाजला. जिल्हा रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. आग भडकत गेल्याने त्यांना वाचविता आले नाही, असे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
असाच प्रकार अहमदनगरमधील बोटा परिसरात घडला. तिथे आंब्यांनी भरलेली एक पिकअप व्हॅन उलटली आणि चालकाला वाचविण्याआधी रस्त्यावर पसरलेले आंबे घेऊन जाण्यासाठी लोकांनी धाव घेतली.

Web Title: Humanity is dead!