माणुसकीला कलंक; झाडाला बांधून मुलीवर केले ब्लेडने वार

By Admin | Updated: November 15, 2016 06:11 IST2016-11-15T06:11:41+5:302016-11-15T06:11:41+5:30

कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेची धग कायम असतानाच सोमवारी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारात एका शाळकरी मुलीला झाडाला बांधून ब्लेडने वार

Human stigma; Bonded by the tree and blade done on the girl | माणुसकीला कलंक; झाडाला बांधून मुलीवर केले ब्लेडने वार

माणुसकीला कलंक; झाडाला बांधून मुलीवर केले ब्लेडने वार

श्रीगोंदा (अहमदनगर) : कोपर्डीतील अत्याचाराच्या घटनेची धग कायम असतानाच सोमवारी बेलवंडी (ता. श्रीगोंदा) शिवारात एका शाळकरी मुलीला झाडाला बांधून ब्लेडने वार करण्यात आले. या संतापजनक कृत्यामागील तरुणांचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.
आठवीत शिकणारी ही मुलगी सोमवारी सकाळी आई आणि काकूसोबत हंगा नदीवर कपडे धुण्यास गेली होती. घरी आल्यानंतर चुलत बहिणीसोबत ती परत नदीवर गेली. तीन बुरखाधारी तरुणांनी तिला उचलून झाडाला बांधले. ब्लेडने वार केले. रक्तबंबाळ तरुणीने व तिच्या चुलत बहिणीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केल्यावर त्या तरुणांनी पळ काढला.

बुरखाधारी अज्ञात तरुण कोण होते?-
घटना घडलेले ठिकाण बेलवंडी गावापासून २ किलोमीटरवर आहे. धुणे धुऊन घरी आलेली ती पीडित मुलगी परत नदीवर का गेली आणि ते बुरखाधारी अज्ञात तरुण कोण होते, याचा तपास सुरू आहे. ‘दिवाळीनंतर तुमच्या मुलींना शाळेत पाठविल्यास घातपात करू.’ अशी धमकी चिठ्ठीद्वार तिच्या काकांना देण्यात आली होती. पीडित मुलीचे कुटुंबीय व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला. पोलिसांनी ते धमकीपत्र ताब्यात घेतले.
मुलीने दिलेल्या जबाबानुसार अज्ञात आरोपींच्या विरोधात पोस्को अंतर्गत (बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा) गुन्हा नोंदविला आहे. आम्ही तपास सुरू केला असून, लवकरच आरोपींना अटक करू.
- सचिन वागंडे, सहायक पोलीस निरीक्षक, बेलवंडी

Web Title: Human stigma; Bonded by the tree and blade done on the girl