शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
3
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
4
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
5
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
6
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
7
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
8
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
9
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
10
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
11
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
12
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
13
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
14
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
15
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
16
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
17
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
18
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
19
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
20
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन

मुंबईतील ९० हजार गाड्यांना ‘एचएसआरपी’; मुदतीनंतर नंबर प्लेट नसलेल्या गाड्यांना दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 15:36 IST

मुंबई : मुंबई आणि उपनगरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (एचएसआरपी) १ लाख ८४  हजार ८८१ ...

मुंबई : मुंबई आणि उपनगरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये (आरटीओ) हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटसाठी (एचएसआरपी) १ लाख ८४  हजार ८८१ अर्ज आले असून आतापर्यंत ९० हजार वाहनांना एचएसआरपी प्लेट बसविण्यात आली आहे. २०१९ पूर्वीच्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी आतापर्यंत राज्यात २० लाख ५० हजारांपेक्षा अधिक अर्ज आले असून एक लाखापेक्षा अधिक वाहनांना नंबरप्लेट बसविण्यात आली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

२०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ३० जूनपूर्वी एचएसआरपी बसविणे बंधनकारक -राज्यात २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सुमारे १ कोटी २५ लाख वाहनांवर हाय सिक्युरिटी प्लेट बसविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. त्यासाठी राज्यातील आरटीओ कार्यालयांत तीन झोनमध्ये ३ वेगवेगळ्या संस्थांची नेमणूक केली आहे. त्यानुसार झोन १ मध्ये १२ आरटीओ कार्यालये, झोन २ मध्ये १६, तर झोन ३ मध्ये २७ आरटीओ कार्यालयांचा समावेश आहे. त्यामुळे २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना ३० जून २०२५ पूर्वी एचएसआरपी बसविणे बंधनकारक असणार आहे. तसेच या मुदतीनंतर एचएसआरपी प्लेट नसलेल्या गाड्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे प्रक्रियाएचएसआरपी प्लेटची किंमत वाहनाचा प्रकार आणि नंबर प्लेटच्या आकारानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. नंबरप्लेटसाठी परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अपॉइंटमेंट घ्यावी लागते. त्याचे शुल्क जीएसटीसह ऑनलाइनच भरावे लागतात. त्यानंतर फिटमेन्ट सेंटरवर निवडलेल्या तारखेला आणि वेळेत त्याची फिटिंग करून घ्यावी लागते.

एचएसआरपीसाठी चार्जेस(जीएसटीसह) 

अशी असते एचएसआरपी ॲल्युमिनियमपासून बनलेली ही नंबरप्लेट असते.त्याची जाडी १ मिलिमीटरपेक्षा थोडी जास्त असते.त्यावर आयएनडी लिहिलेले असून क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक असते.होलोग्रामखाली लेसर ब्रँडेड १० अंकी पिन कोड असतो.

आरटीओ     नंबर प्लेट    प्राप्त  कार्यालय    बसवले    अर्जमुंबई सेंट्रल    ३७,०६१    ९४,६६४वडाळा    ५२,८२०    ९०,००७९

टॅग्स :bikeबाईकRto officeआरटीओ ऑफीस