पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 07:39 IST2025-05-07T07:39:30+5:302025-05-07T07:39:39+5:30
२३ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत, १३ जूनपासून कॉलेज सुरू होणार

पदवीसाठी २७ मे रोजी पहिली गुणवत्ता यादी ; उद्यापासून प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षीय पदवीसाठी ८ मेपासून मुंबई विद्यापीठाकडून नावनोंदणी सुरू होणार आहे. २३ मेपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. तर पहिली गुणवत्ता यादी २७ मे रोजी जाहीर केली जाणार आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, स्वायत्त महाविद्यालये, मान्यताप्राप्त शिक्षण संस्था आणि विद्यापीठातील शैक्षणिक विभागामध्ये प्रवेशासाठी वेळापत्रक जाहीर केले आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ साठी ३ वर्षीय पदवी अभ्यासक्रम, ४ वर्षीय ऑनर्स/ऑनर्स विथ रिसर्च, ५ वर्षीय इंटिग्रेटेड प्रोग्राम्स विथ मल्टिपल एंट्री अँड मल्टिपल एक्झिटनुसार प्रवेश प्रक्रिया होणार आहे. बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी करणे अनिवार्य आहे. संकेतस्थळावर प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी करावी लागणार आहे, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौंदळे यांनी सांगितले.
या अभ्यासक्रमांसाठी प्रवेशप्रक्रिया
विद्यापीठाने प्रथम वर्ष बीए, बीएस्सी, बीकॉम, बीए-एमएमसी, बीएसडब्ल्यू, बीए (फिल्म टेलिव्हिजन अँड न्यू मीडिया प्रोडक्शन), बीए (फ्रेंच स्टडीज), बीए (जर्मन स्टडी), बॅचलर ऑफ कलिनरी आर्ट, बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन जर्मन स्टडीज), बीए-एमए (इंटिग्रेटेड कोर्स इन पाली) बीएमएस-एमबीए (एकात्मिक अभ्यासक्रम), बीकॉम (फायनान्शिअल मार्केट), बीकॉम (अकाउंटिंग अँड फायनान्स), बीकॉम (बँकिंग अँड इन्शुरन्स), बीकॉम (फायनान्शिअल मॅनेजमेंट), बीकॉम (इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट), बीकॉम (ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट), बीकॉम (मॅनेजमेंट स्टडीज), बीएस्सी (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी), बीएस्सी (कॉम्प्युटर सायन्स), बीएस्सी (हॉस्पिटॅलिटी स्टडी), बीएस्सी (मायक्रोबायोलॉजी), बीएस्सी (बायो-केमेस्ट्री), बीएस्सी (बायो-टेक्नॉलॉजी), बीएस्सी (मेरिटाइम), बीएस्सी (नॉटीकल सायन्स), बीएस्सी (फॉरेन्सिक सायन्स), बीएस्सी (होम सायन्स), बीएस्सी (एरॉनॉटिक्स), बीएससी (डेटा सायन्स), बीएस्सी (एव्हिएशन), बीएस्सी (ह्यूमन सायन्स), बी.व्होक. (टी अँड एचएम, आरएम, एफएम अँड एस, आरईएम, एमपी, एमएलटी, ग्रीन हाऊस मॅनेजमेंट, फार्मा एनालिटिकल सायन्स, टूरिझम अँड ट्रॅव्हल मॅनेजमेंट, एफ. वाय. बी व्हॉक (सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट), एफवाय बी. लायब्ररी सायन्स, बी. म्युझिक, बीपीए (म्युझिक), बीपीए (डान्स) एफवाय बीएस्सी (बायोएनालिटिकल सायन्स-एकात्मिक अभ्यासक्रम) यासह विविध अनुदानित, विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी सुरू आहे.
ऑनलाइन नोंदणीचे वेळापत्रक
अर्जविक्री (संबंधित महाविद्यालयाद्वारे ऑनलाइन/ऑफलाइन) – ८ मे ते २३ मे
प्रवेशपूर्व ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया (विद्यापीठ संकेतस्थळावर) – ८ मे ते २३ मे
पहिली मेरिट लिस्ट – २७ मे
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी,
शुल्क भरणा – २८ मे ते ३० मे
दुसरी मेरिट लिस्ट - ३१ मे
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी,
शुल्क भरणा - २ जून ते ४ जून
तिसरी लिस्ट - ५ जून
ऑनलाइन कागदपत्रे पडताळणी,
शुल्क भरणा - ६ जून ते १० जून
वर्ग सुरू होणार - १३ जून