शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 11:30 IST

Maharashtra Board HSC 12th Result 2025 Release: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे.

Maharashtra HSC Result 2025 ( Marathi News ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. राज्याचा एकूण निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. या वर्षी १.४९ टक्के निकाल कमी लागला आहे. राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,२७,०८५ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१७,९६९ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,०२,८७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ९१.८८ आहे.

पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल

या वर्षी निकालाचा टक्का घसरला आहे. फेब्रुवारी मार्च २०२४ चा निकाल ९३.३७ टक्के लागला होता. फेब्रुवारी मार्च २०२५ चा निकाल ९१.८८ टक्के लागला आहे. निकालाचा टक्का १.४९ ने यंदा कमी झाला आहे. या वर्षी कॉपी विरोधात कडक मोहिम राबवली होती. यामुळे निकाल कमी  लागल्याचे सांगण्यात आले आहे. एकूण १५४ विषयांपैकी ३७ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

"राज्यात ११ फेब्रुवारी  ते मंगळवार,१८ मार्च २०२५ या कालावधीत घेण्यात आली होत्या. या परीक्षेसाठी एकूण १५,०५,०३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली होती.  ८,१०,३४८ मुले, ६,९४,६५२ मुली, ३७ ट्रान्सजेंडर. एकूण १०५५० कनिष्ठ महाविद्यालयांमधून या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती, तर या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यात विद्याथ्यांसाठी ३३७३ मुख्य केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली, अशी माहिती शरद गोसावी यांनी दिली.

विभागनिहाय निकाल

पुणे-९१.३२ टक्के

कोकण- ९६.७४ टक्के

नागपूर- ९१.३२ टक्के

छत्रपती संभाजीनगर-९२.२४ टक्के

मुंबई- ९२.९३ टक्के

कोल्हापूर- ९३.६४ टक्के

अमरावती- ९१.४३ टक्के

नाशिक – ९१.३१ टक्के

लातूर – ८९.४६ टक्के

बारावीचा निकाल या लिंकवर पाहता येईल

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

http://hscresult.mkcl.org

महाविद्यालयांसाठी

https://mahahsscboard.in

टॅग्स :HSC Exam Resultबारावी निकालexamपरीक्षाHSC / 12th Exam12वी परीक्षाResult Dayपरिणाम दिवस