हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट

By Admin | Updated: November 1, 2014 22:05 IST2014-11-01T13:47:11+5:302014-11-01T22:05:03+5:30

अभिनेता हृतिक रोशन व त्याची पत्नी सुझान खान या दोघांच्या घटस्फोटाला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने अखेर आज मान्यता दिली.

Hrithik Roshan-Suzanne Khan's divorce finally | हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट

हृतिक रोशन-सुझान खानचा अखेर घटस्फोट

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १ - अभिनेता हृतिक रोशन व त्याची पत्नी सुझान खान या दोघांच्या घटस्फोटाला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने अखेर आज मान्यता दिली. दरम्यान या दोघांच्या दोन मुलांचा ताबा कोणाकडे द्यायचा तसेच पोटगीबाबत सुनावणी सुरू असून अद्याप निर्णय बाकी आहे.

हृतिक व सुझान यांच्यात काही काळापासून बेबनाव सुरू होता. काही महिन्यापूर्वी हृतिकने आपण व सुझान वेगळं होत असल्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. हे दोघे पुन्हा एकत्र यावेत, त्यांच्यातील तणाव निवळावा यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी खूप प्रयत्न केला, मात्र ते असफल ठरले. अखेर आज वांद्रे न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली असून ते दोघे कायदेशीररित्या वेगळे झाले आहेत.

 

Web Title: Hrithik Roshan-Suzanne Khan's divorce finally