शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 16:37 IST

लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत.

मशाल विरुद्ध धनुष्यबान हा लोकसभेत जिंकलेला आहे. लोकसभा निवडनुकीत आम्ही 13 जागा समोरासमोर लढलो. त्यांपैकी सात जागा आम्ही जिंकल्या. 40 टक्के स्ट्राइकरेट त्यांचा तर 47 टक्के स्ट्राइकरेट आमचा होता. त्याच बरोबर आम्हाला 2 लाख 60 हजार मते अधिक मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभेत एवढी सर्व फेका-फेक करून फेक नरेटिव्ह करूनही धनुष्यबान त्यांच्यावर भारी पडला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ते ठाण्यात पत्रकारांसोबत बोलत होते.

आपण मुख्य नेते म्हणून उमेदवारांच्या प्रचारार्थ संपूर्ण महाराष्ट्रात फिरणार आहात, या विधानसभेचा स्ट्राइकरेट कसा असेल असे वाटते? यावर बोलताना शिंदे म्हणाले, "मी सांगितले तुम्हाला की, स्ट्राइकरेट जो आहे, लोकसभेत एवढे सर्व फेक नेरेटिव्ह पसरवूनसुद्धा, लोकांना फसवूनही आमचा स्ट्राइकरेट उबाठा पेक्षा अधिक होता. तसेच महायुतीचा स्ट्राइकरेट जो आहे, तो या निवडणुकीत कामाच्या जोरावर, विविध योजनांच्या जोरावर स्ट्राइकरेट एकदम सर्वात भारी असेल आणि सर्वांना चारीमुंड्या चीत करेल. आमचे लोक या निवडणुकीत चौराक आणि षटकार मारतील

लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे -आम्ही जेव्हा लाडकी बहीण योजना सुरू केली, त्याच वेळी त्यांनी (महाविकास आघाडी) खोडा घातला. ते न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने त्यांना चपराक दिली, हाकलवून लावले. यानंतर ते नागपूरच्या न्यायालयात गेले. काँग्रेसचे वडपल्लीवार गेले आहेत. त्यामुळे लाडकी बहिण योजना त्यांच्या पोटात सलती आहे आणि पोटात खुपती आहे. त्यांनी सगळं सांगितलं आहे की, ज्या योजना सुरू केल्या आहेत, त्या बंद पाडू, चौकशी करू. म्हणून त्यांना जनता साथ देणार नाही. त्यांचे सरकारच येणार नाही. त्यामुळे त्यांना संधी मिळणार नाही. लाडक्या बहिणींनी ठरवले आहे की, या लाडक्या भावांना पुन्हा या सरकारमध्ये आणायचे आहे, असेही शिंदे यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४