शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार खोटे बोलणा-या मुख्यमंत्र्यांवर विश्वास कसा ठेवायचा? - खा. अशोक चव्हाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2018 17:16 IST

वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.   

मुंबई - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली आहे.  शेतकरी कर्जमाफी, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण अशा विविध विषयांवर वारंवार खोटे बोलून जनतेची दिशाभूल करणा-या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनावर विश्वास कसा ठेवायचा? असा सवाल चव्हाण यांनी केला आहे.   महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री खा. अशोक चव्हाण नांदेड येथे पत्रकारांशी बोलताना  म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत धनगर समजाला आरक्षण देऊ. मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवू अशी आश्वासने दिली होती. सत्तेत येऊन साडेतीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला, पण हे प्रश्न काही सुटले नाहीत. मुख्यमंत्र्यांनी शेतक-यांना कर्जमाफी देण्याची घोषणा करून एक वर्ष उलटले तरी अद्याप कर्जमाफी मिळाली नाही. आरक्षणाचा प्रश्न सोडवण्याऐवजी आरक्षणाच्या मुद्द्यावरून बेताल वक्तव्ये केली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नारायण राणे हे वेगवेगळी वक्तव्ये करून संभ्रम निर्माण करत आहेत,"  "मुस्लीम आरक्षणाला न्यायालयाने मान्यता दिली आहे. तरीही सरकार मुस्लीम समाजाला आरक्षण देत नाही. मुख्यमंत्री याबाबत काहीच बोलत नाहीत. सरकारने मुस्लीम आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. मेगाभरती रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे. मात्र यामुळे सर्वच समाजातील वयोमर्यादा संपत आलेल्या तरूणांचे नुकसान होणार आहे. मराठा आरक्षण मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सांगत आहेत. काँग्रेस सरकारने मराठा समाजाला 16%आरक्षण दिले होते. तेवढ्या जागा मराठा तरूणांसाठी रिक्त ठेवून इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता सरकार मेगाभरती करेल, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. मग आता अचानक भरती रद्द का केली? मराठा आरक्षणाच्या आंदोलनाप्रमाणेच मेगाभरतीचा उपयोग करून मराठा विरूध्द इतर समाज असा संघर्ष निर्माण करण्याचा डाव आहे का? असे प्रश्न खा. चव्हाण यांनी विचारले. काँग्रेस सरकारने मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण दिले होते. काँग्रेस पक्षाने कधीही आरक्षणाच्या मुद्दयाचे राजकारण केले नाही. सत्ताधारी भाजपानेच आरक्षणावरून राजकीय कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यात शांतता असावी ही आमची इच्छा आहे. त्यामुळे हिंसा व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करू नये, असे आवाहन आम्ही सातत्याने केले आहे. आज पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी लोकशाही मार्गानेच लढा द्यावा असे आवाहन आम्ही सर्वांना करत आहोत असे खा. चव्हाण म्हणाले. भाजप खा. हिना गावीत यांच्यावरील हल्ल्याची घटना निषेधार्ह असल्याचे सांगून हा शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा परिणाम आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्र