शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 10:10 IST

राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे.

दीपक भातुसे लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई : राज्यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षण सेवकांना तुटपुंजा मानधनावर काम करावे लागत आहे. या कमी मानधनात संसाराचा गाडा चालवणे अवघड होत असल्याने मानधन कालावधी रद्द करावा, अशी मागणी होत आहे. राज्यात २८ हजार शिक्षण सेवक असून, कनिष्ठ लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक व अनुकंपामार्फत भरले गेलेले शिपाई पदे, असे जवळपास हजारो कर्मचारी हे मानधन तत्त्वावर काम करीत आहेत.

एप्रिल २०२५ पासून राज्य सरकारने मानधन तत्त्वावर शिक्षण सेवक पदांची भरती सुरू केली. नियुक्तीपासून शिक्षण सेवकांना तीन वर्षे मानधन पद्धतीवर काम करावे लागते. त्याऐवजी शिक्षण सेवकांसाठी भरतीनंतर फक्त एक वर्षाचा परिविक्षाधीन (प्रोबेशन) कालावधी ठेवावा व या कालावधीत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पूर्ण पगार मिळावा, अशी शिक्षण सेवकांची मागणी आहे.  

शासकीय नोकर भरतीची प्रतीक्षा करणाऱ्या बहुतेक उमेदवारांचे सरासरी वय ३५ ते ३८ झाले आहे. त्यात शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर तीन वर्षांचा मानधन कालावधी असल्यामुळे वाढत्या वयाबरोबर मानधन कालावधीमुळे मानसिक ताणतणाव वाढला आहे. 

"वर्षानुवर्षे अभ्यास करून वयाच्या ३०-३५ व्या वर्षी नोकरी लागल्यावर पुढे तीन वर्षे मानधनावर काम करावे लागते. त्यामुळे आर्थिक व मानसिक परिस्थिती ढासळत आहे. दुसऱ्या जिल्ह्यातून गेल्यावर १०-१५ हजारांवर संसाराचा गाडा चालविणे अवघड होते."-  महेश घरबुडे, अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन

"राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्यात शिक्षण सेवक पद रद्द करावे, असे स्पष्ट आदेश असतानाही शिक्षण सेवकांना मानधनावर काम करावे लागत आहे. शासनाच्या विविध विभागातील पदभरतीत मूळ वेतनावर नियुक्ती होते. त्यामुळे शासनाने मानधन कालावधी रद्द करावा."- प्रशांत शिरगूर, समन्वयक, पवित्र पोर्टल शिक्षण सेवक कृती समिती   

"मी मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून, माझी निवड रायगड जिल्ह्यात झाली आहे. सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन परत ३ वर्षे मानधनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड होत चालले आहे."मी मूळ धाराशिव जिल्ह्यातील असून, माझी निवड रायगड जिल्ह्यात झाली आहे. सरळसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन परत ३ वर्षे मानधनावर काम करीत आहे. महागाईच्या काळात जीवन जगणे अवघड होत चालले आहे." - प्रतीक्षा जाधव, शिक्षण सेविका

टॅग्स :Educationशिक्षणMaharashtraमहाराष्ट्रTeacherशिक्षक