शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

किती वेळात सत्तासंघर्षाचा निकाल देणार? सर्वोच्च न्यायालयाचे नार्वेकरांना अहवाल देण्याचे आदेश, निकम म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 18:24 IST

Eknath Shinde vs Uddhav Thackeray, Supreme Court: सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ज्येष्ठविधीज्ञ ॲड उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  

एकनाथ शिंदे गटाच्या आपात्रतेबाबत लवकरात लवकर निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. वाजवी वेळेत सत्ता संघर्षाबाबत विधानसभा अध्यक्ष निर्णय घेत नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने दुःख व्यक्त केले आहे. तसेच आम्ही जे मत व्यक्त केले आहे त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

 सत्ता संघर्षाबाबत सुप्रीम कोर्टाच्या निकालावर ज्येष्ठविधीज्ञ ॲड उज्वल निकम यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  आमदारांच्या अपात्रते संदर्भातला निर्णय देण्याचा अधिकार हा पूर्णतः विधानसभा अध्यक्षांचा आहे. विधिमंडळाचा आदर ठेवूनच सुप्रीम कोर्टाने हा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. विधानसभा अध्यक्षांनी दोन आठवड्याच्या आत आपण केलेल्या कारवाईचा लेखाजोखा आणि यापुढे किती वेळात हा निकाल लागू शकणार यासंदर्भातला अहवाल विधानसभा अध्यक्षांकडून मागवला आहे, असे निकम म्हणाले. 

न्यायव्यवस्था आणि विधिमंडळ यात कुठलाही संघर्ष होऊ नये म्हणून न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्षांना घटनेनुसार निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. त्यानुसार आम्ही जे मत व्यक्त केल आहेत त्यानुसार योग्य तो निर्णय घेण्याची अपेक्षा न्यायमूर्तींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष यांना दोन आठवड्यात त्यांचा अहवाल हा द्यावा लागेल. आतापर्यंत त्यांनी काय कारवाई केली आणि किती दिवसात निकाल देणार, असे या अहवालात त्यांना द्यावे लागणार आहे, असे निकम यांनी स्पष्ट केले. 

विधानसभेची जोपर्यंत मुदत आहे त्या मुदतीच्या आत हा निर्णय घेणे अपेक्षित आहे. विधानसभा अध्यक्ष हे स्वतः कायदे पंडित असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जे मत नोंदवले आहेत त्यांचा आदर ठेवून सत्ता संघर्षाबाबतची कारवाई कधी संपेल याचा वस्तुनिष्ठ अहवाल विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाला द्यावा लागेल. जेणेकरून विधिमंडळ व न्यायव्यवस्था यांच्यात कुठलाही अभाव निर्माण होणार नाही, असे निकम यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमEknath Shindeएकनाथ शिंदेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयUddhav Thackerayउद्धव ठाकरे