शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Petrol, Diesel Price Hike story in Pune: पेट्रोल, डिझेलच्या किंमती कितीने वाढल्या? अहो त्या पैशांत अडीज लीटर दूध आले असते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2022 15:04 IST

Petrol, Diesel Price Hike calculation: आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवासांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेल प्रत्येकी ४ रुपयांनी महागले आहे. 80,80,80,80,50,30 असे करत करत तब्बल ४.१० रुपयांची वाढ झाली आहे. आता घरखर्चाचा हिशेब घालताना लोकांची तारांबळ उडत असल्याचे दिसत आहे. हे इंधनाचे दर आणखी वाढण्याचा अंदाज आहे. बात चली तो कहा तक जाएगी, कोणालाच माहिती नाही, पण काल एका पुणेकराने घातलेला हिशेब सर्वांचे डोळे पांढरे करणारा नक्कीच आहे. पुण्यातील एक कार चालक रविवारी कारची टाकी फुल करण्यासाठी गेला होता. आज करू, उद्या करू असे म्हणत त्याने गेल्या सोमवारपासून आजच्या सोमवारपर्यंत वेळ काढला, हा वेळकाढू पणा त्याला एवढा महागात पडेल याची कल्पना देखील नव्हती. 35 लीटर इंधन टाकीत बसले. त्यासाठी जवळपास 3,379 रुपये खर्च आला. एकदा पेट्रोल पंपावर गेला की टाकी फुल करण्याची सवय अनेकांना असते, म्हणजे पुन्हा पुन्हा तिकडे जाण्याचा प्रश्न येत नाही.

घरी आल्यावर त्याने 35 ला गेल्या सहा दिवसांत वाढलेल्या दराने गुणले आणि हिशेब घातला. त्या पैशांत घरात अडीच लीटर दूध आले असते, असे म्हटले आणि डोक्यावर हात मारून घेतला. 35 * 3.70 रुपयांचे झाले 129.5 रुपये. २५ रुपये दराने अर्धा लीटर दूध पकडले तर अशा पाच पिशव्या आल्या असत्या आणि वर साडे चार रुपये उरले असते. पण नुकसान झालेच. असेच नुकसान अन्य लोकांचेही होत आहे. 

ठाकरे सरकारकडून कर कपातीची अपेक्षाच करू नका...

इंधनाचे दर वाढत चालले आहेत आणि राज्य सरकारने दिवाळीतच त्यावरील कर कमी केले नव्हते. देशभरात जवळपास सर्व राज्यांनी हे दर कमी केले होते. केंद्राने कर कमी करताच राज्यांनीही त्याची री ओढली होती. परंतू महाराष्ट्रात कर कमी होणार नाही, असे राज्यकरर्त्यांनी ठणकावून सांगितले होते. यामुळे आताही हे कर कमी करण्याची शक्यता नाहीच आहे. अशामुळे भविष्यात वाढीव दरांपेक्षा अनेकजणांना आताच टाक्या फुल करण्यास सुरुवात केली आहे. असे केल्याने इंधनाच्या मागणीतही देशभरात मोठी वाढ झाली आहे. पुण्यातील हे एक उदाहरण होते, परंतू याचा फटका हिशेब घातल्यास तुम्हालाही किती मोठ्या प्रमाणावर बसू शकतो, याची कल्पना येईल. याशिवाय या इंधन दरवाढीने अन्य गोष्टींच्या किंमती वाढतील याचा फटका वेगळाच. 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढPetrolपेट्रोलDieselडिझेलmilkदूध