शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

असा झाला होता राज्य बँकेचा घोटाळा

By अतुल कुलकर्णी | Updated: August 23, 2019 12:22 IST

अनेक धक्कादायक गोष्टी राज्य बँकेत घडल्या होत्या. त्यावर नाबार्डने गोपनिय अहवाल दिला होता. हा अहवाल लोकमतने मिळवून बँकेचे घोटाळे बाहेर आणले होते.

- अतुल कुलकर्णीमुंबई : राज्य सहकारी बँकेच्या तत्कालिन संचालक मंडळानेच ही बँक अडचणीत आणली, शेकडो चुका केल्या, बँकेचे २७०३.८६ कोटी रुपयांचे एनपीए झाले होते, स्वत:च्या अधिकारात नसताना बँकेने हाऊसिंग फायनान्सला १०० कोटी रुपयांचे कर्ज दिले होते, अशा अनेक धक्कादायक गोष्टी राज्य बँकेत घडल्या होत्या. त्यावर नाबार्डने गोपनिय अहवाल दिला होता. हा अहवाल लोकमतने मिळवून बँकेचे घोटाळे बाहेर आणले होते. या संचालक मंडळात भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सदस्य होते.बँकचे संचालक मंडळ असताना ३१ मार्च २०१० रोजी बँकेच्या ठेवी २१,४२० होत्या. पुढे संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर ७ मे २०११ रोजी या ठेवी १६,७७२ रुपयांवर आल्या. तर प्रशासकांच्या काळात म्हणजे ३० ऑगस्ट २०१४ रोजी बँकेच्या ठेवी ११,८०० रुपयांवर आल्या होत्या. त्यावेळी संचालक मंडळाच्या काळात ठेवी जास्त दिसत असल्या तरी त्या जास्तीचे व्याज देऊन  आणल्या गेल्या होत्या. व्याजाएवढेही उत्पन्न त्यातून मिळत नव्हते असे तेव्हा प्रमोद कर्नाड यांनी सांगितले होते. यातच सगळे काही आले. बँकेचे १६१० कोटी रुपये १६ साखर कारखान्यांनी थकवले होते. तर याच कारखान्यांनी साखर विकून आलेले पैसे देखील बँकेच्या कर्जखात्यात भरले नव्हते. ग्रामीण कर्जपुरवठ्याची, शेतीसाठीच्या कर्जाची सोय करणे हे या बँकेचे मुख्य काम होते पण चुकीच्या पध्दतीने बँक वर्षानुवर्षे चालवली गेली आणि आता आपल्याच नाकातोंडात पाणी जाऊ लागल्यानंतर राज्य बँकेने बडतर्फ संचालकांनी घालून दिलेल्याच पायवाटेने जात १७ सहकारी कारखाने खाजगीकरणात विकून टाकले आणि आम्हाला आमचे पैसे मिळाले याची शाबासकीही मिळवली होती.संचालक मंडळाची संख्या ५२ वरुन २८ आणा अशी महत्वाची शिफारसही नाबार्डने केली होती. विशेष म्हणजे सहकारी चळवळीच्या शताब्दी वर्षात (सन २०११) ही बँक दिवाळखोरीत आली होती. राज्य बँकेची दिवाळखोरी जाहीर झाली असती तर ५७२ नागरी सहकारी बँका, ३१ जिल्हा बँका, १००९ विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अडचणीत आल्या असत्या. लोकमतच्या मालिकेनंतर राज्यभर राजकीय गहजब झाला. त्यावेळी एकनाथ खडसे विरोधी पक्ष नेते होते. विधानसभेचे अधिवेशन चालू होते. यावर भाषण करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री व तेव्हाचे भाजपाचे धडाडीचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत भाषण करण्याआधी लोकमतकडून सगळा अहवाल मागून घेतला होता आणि भाषण केले होते. शेवटी केंद्र सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्याची शिफारस केली व रिझर्व्ह बँकेने मंडळ बरखास्त करण्यास मान्यता दिली आणि ७ मे २०११ रोजी सहकार विभागाने संचालक मंडळ बरखास्तीचे आदेश काढले. तेव्हा राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सुधीरकुमार गोयल यांना प्रशासक नेमण्याचा आग्रह धरला होता. शेवटी गोयल यांच्यासह सुधीर श्रीवास्तव या दोन्ही प्रधानसचिवांना प्रशासक म्हणून नेमले. प्रमोद कर्नाड हे त्यावेळी बँकेचे एमडी होते. तिघांनी बँकेची गाडी रुळावर आणण्याचे प्रयत्न केले. १ वर्षे त्यांनी काम केले. नंतर जतींदर सहानी व व्ही.के.अग्रवाल यांना प्रशासक म्हणून नेमले गेले. पुढे भाजप सेनेचे सरकार आल्यानंतर महसूल मंत्री चंद्रकांत पाटील एम.एस. सुखदेवे, ए.ए. मकदूम आणि के.जी. तांबे यांना प्रशासक नेमले. आता विद्याधर अनासकर हे बँकेचे प्रशासक आहेत तर सहाय्यक समितीत अविनाश महागावकर आणि संजय भेंडे आहेत.

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रCorruptionभ्रष्टाचारfraudधोकेबाजीMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणCourtन्यायालय