शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

Uddhav Thackeray : भाजप शिंदे गटाचा उपयोग कसा करतोय? उद्धव ठाकरेंनी दिलं अमिताभ बच्चन यांच्या जाहिरातीचं उदाहरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 19:26 IST

उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला.

खरी शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरे गटाची, की एकनाथ शिंदे गटाची, हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहोचल्यानंतर, आयोगाने निर्णय होईपर्यंत शिवसेना नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले आहे. यानंतर, निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या दोन्ही गटांना अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दिलेल्या निवडणूक चिन्हांच्या पर्यायांपैकी 3 पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे गटाने आता चिन्हासाठी आणि पक्षाच्या नावासाठी आयोगाकडे पर्यायही दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी आज फेसबूक लाईव्हच्या माध्यमाने जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदेगटावर जोरदार हल्ला चढवला.

भाजप शिंदे गटाचा उपयोग करून घेतोय... -भारतीय जनता पक्ष शिंदे गटाचा उपयोग कसा करून घेतोय? यासंदर्भात बोलताना उद्झव ठाकरे म्हणाले, अमिताभ बच्चन एका सरबताची जाहीरात करत आहेत. ती बाटली आपण विकत घेतो. बाटली घरी आणल्यानंतर, ती जपून वापरतो. फ्रीजमध्ये ठेवतो. मात्र, त्या सर्बताच्या बाटलीतील सर्बत संपल्यानंतर, ती आपण कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. तसेच या गटाचे होणार आहे. एवढेच नाही, तर शिवतिर्थावरच्या सभेत सर्वांच्याच लक्षात आले आहे. की निष्ठावाण माणसं आमच्यासोबत आहेत. आता काही शिवसैनिकांना धमक्या येत आहेत. आणीबाणी पेक्षाही भयंकर प्रकार सुरू आहे. 

चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाण गोठवला, आईच्या काळजात कट्यार घुसवली -उद्धव ठाकरे म्हणाले, काल निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला, शिवसेनेचे नाव गोठवले आणि चिन्हही गोठवले. शिवसेना प्रमुख ज्या निवडणूक चिन्हाची धनुष्यबाणाची पूजा करत होते, तो धनुष्यबाण आजही त्यांच्या देव्हाऱ्यात आहे. पण चाळीस डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामांचा धनुष्यबाणही गोठवला. यासाठी थिजलेली मनं आणि गोठलेले रक्तच हवे. कारण शिवसेना म्हटले, की सळसळते आणि तापलेले रक्त. गोठलेल्या रक्ताची येथे गरजच नाही. उलट्या काळजाची माणसं, जी आज फिरत आहेत. ज्या शिवसेनेने तुम्हाला राजकीय जन्म दिला. त्या आईच्या काळजात तुम्ही कट्यार घुसवली. अशा या उलट्या काळजाच्या माणसांनी शिवसेनेचे चिन्ह गोठवले. या मागे जी महाशक्ती आहे, त्यांनाही आनंद होत असेल, की बघा आम्ही करून दाखवले. कशी ही माणसं, काय मिळवलं तुम्ही? असा सवालही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला. 

यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपण निवडणूक आयोगाकडे चिन्हासाठी त्रिशूल, उगवता सूर्य आणि मशाल या 3 चिन्हांना पसंती दिली असल्याचे आणि पक्षासाठी शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना(प्रबोधनकार ठाकरे) या 3 नावांचा पर्याय दिला असल्याचेही सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा