सिंचन घोटाळ्यांचा तपास कुठपर्यंत?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:40 IST2018-04-27T01:40:10+5:302018-04-27T01:40:10+5:30
यासंदर्भात न्यायालयात जनमंच व अतुल जगताप यांच्या दोन जनहित याचिका प्रलंबित आहेत.

सिंचन घोटाळ्यांचा तपास कुठपर्यंत?
नागपूर : अमरावती व नागपूर विभागासाठी स्थापन विशेष तपास पथकांनी आतापर्यंत सिंचन घोटाळ्याचा काय तपास केला, अशी विचारणा करीत नागपूर खंडपीठाने यावर येत्या ४ मेपर्यंत माहिती सादर करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.
यासंदर्भात न्यायालयात जनमंच व अतुल जगताप यांच्या दोन जनहित याचिका प्रलंबित आहेत. जनमंचच्या याचिकेत विदर्भातील एकूणच सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या घोटाळ्यांचा मुद्दा मांडण्यात आला आहे. तसेच जगताप यांनी बाजोरिया कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आलेल्या चार सिंचन प्रकल्पांच्या कंत्राटांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आतापर्यंत सिंचन घोटाळ्याची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत खुली चौकशी करण्यात येत होती. ती चौकशी अत्यंत संथगतीने सुरू होती. परिणामी, न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केली होती. त्यातून धडा घेत सरकारने नागपूर व अमरावती विभागातील सिंचन घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी दोन विशेष तपास पथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला.