शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सरकार बदलले की निर्णय कसे बदलता?; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 07:45 IST

जेव्हा कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे तो सरकारचा निर्णय असतो. त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

मुंबई - शेतकऱ्यांना उसाची एफआरपी देण्यावरून सरकारची भूमिका सातत्याने बदलत असल्याने उच्च न्यायालयाने सोमवारी सरकारला खडे बोल सुनावले. सरकार बदलले की निर्णय कसे बदलता, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे वैयक्तिक पातळीवर निर्णय घेत नसतात. त्यांचे निर्णय हे सरकारचे निर्णय म्हणून पाहिले जातात. एका व्यक्तीचे निर्णय म्हणून त्याकडे पाहिले जात नाही. गेली तीन वर्षे शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे. सरकार शेतकऱ्यांबाबत असंवेदनशील आहे का, असा सवाल न्यायालयाने सरकारला केला.

सुनावणीत प्रादेशिक सहसंचालक उपस्थित राहणे योग्य होईल, असे म्हणत न्यायालयाने राज्य सरकारला आदेशाची अंमलबजावणी केव्हा करणार याची माहिती देण्याचे निर्देश दिले. सरकारने स्पष्ट न केल्यास आपणच मंगळवारी निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले. ऊस साखर कारखान्यांत पोहोचल्यानंतर १४ दिवसांत त्यांना एकरकमी एफआरपी देण्यासंदर्भात केंद्र सरकारचा २०२२ चा कायदा आहे. मात्र, हा कायदा न जुमानता राज्य सरकारने साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना दोन ते तीन हप्त्यांत एफआरपी देण्याची मुभा २०२२ मध्ये काढलेल्या अधिसूचनेद्वारे दिली. या अधिसूचनेला राजू शेट्टी यांनी ॲड. योगेश पांडे यांच्याद्वारे उच्च न्यायालयात आव्हान दिले.

केंद्र सरकारच्या कायद्यात  हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतानाही राज्य सरकारने अधिसूचना काढून साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना एफआरपी दोन ते तीन हप्त्यांत देण्याची परवानगी दिली. ही अधिसूचना बेकायदेशीर असून रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली. तीन वर्षे ही याचिका सुनावणीस आली नाही. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही अधिसूचना मागे घेण्याचा ठराव मंजूर केला, तरीही त्यावर अंमलबजावणी करण्यात आली नाही. ही बाब याचिकेवर सुनावणीत ॲड. पांडे यांनी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाच्या निदर्शनास आणण्यात आली. 

न्यायालयाचा संतापत्यावर न्यायालयाने अद्याप या ठरावावर अंमल का करण्यात आला नाही? अशी विचारणा सरकारकडे केली. प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांना या निर्णयावर कायदेशीर मत घ्यायचे आहे, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यांच्या या उत्तरावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.

अंमलबजावणी बंधनकारक ‘आम्ही या उत्तरावर हैराण आहोत. तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय याचिकादार आणि सर्व प्रशासकीय संस्थांना स्पष्टपणे कळविण्यात आला.  एखादा अधिकारी त्या निर्णयाशी सहमत नाही किंवा त्याला त्या निर्णयाबाबत कायदेशीर मत घ्यायचे आहे, हे आश्चर्यकारक आहे. आमच्या माहितीनुसार, सरकार अशा प्रकारे काम करत नाही. बैठकीत जो निर्णय घेण्यात आला आणि तो कायदेशीर आहे,   जेव्हा कार्यकारिणीने निर्णय घेतला आहे तो सरकारचा निर्णय असतो. त्याची अंमलबजावणी करणे बंधनकारक आहे,’ असे न्यायालयाने म्हटले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊस