शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2024 16:53 IST

काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी आहेच. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते निकालावर कळणार आहे. मंत्र्यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित!

सुनील पाटीलजळगाव जिल्ह्यातील अमळनेर मतदारसंघ तसा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र गेल्या दोन, तीन वेळच्या निवडणुका पाहता राष्ट्रवादी अन् अपक्षांनीच येथे बाजी मारली आहे. आताही मंत्री अनिल पाटील यांना कॉग्रेसपेक्षा अपक्ष माजी आमदार शिरीष चौधरी यांचेच तगडे आव्हान आहे. महाविकास आघाडीकडून कॉग्रेसचे डॉ. अनिल शिंदे रिंगणात आहेत.

या मतदारसंघात कॉग्रेस उमेदवाराला चार वेळा मतदारांनी आमदारकीची संधी दिली आहे. त्याखालोखाल भाजपला तीन वेळा तर जनता पार्टीला दोन वेळा आमदारकीची संधी मिळाली आहे. दोन वेळा अपक्ष निवडून आलेले आहेत. शिरीष चौधरी भाजपचे मानले जातात. स्थानिक भाजप कार्यकर्ते महायुतीसोबत राहतात की आतून चौधरींना मदत करतात याविषयी संभ्रम आहे.

काँग्रेसमध्येही अंतर्गत गटबाजी आहेच. या तिरंगी लढतीत कोण बाजी मारतं ते निकालावर कळणार आहे. मंत्र्यांना निवडणूक सोपी नाही हे मात्र निश्चित ! या मतदार संघात अलिकडच्या कालखंडापासून एक आमदार पुन्हा विजयी झालेला नाही. खास करून अपक्ष आणि त्यातल्या त्यात अमळनेर तालुक्यातील रहिवाशी नसलेल्या उमेदवारांनाच मतदारानी निवडून दिलेले आहे. स्थानिक असलेले बी.एस.पाटील हे सलग विजयी झालेले आहेत.

आता अनिल पाटील हे देखील स्थानिकच आहेत. त्यामुळे मतदार नेमका कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुकतेचे आहे.

लोकसभेला काय लागला होता निकाल?

जळगाव लोकसभा मतदारसंघ हा खरंतर भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. यावेळी भाजपच्या स्मिता वाघ यांना २ ६८.५६ टक्के मतदान आणि ७१ हजार ७० मतांचे मताधिक्य मिळाले. सारबेटे गावाचा अपवाद वगळता उर्वरित अमळनेर शहर आणि तालुक्यात प्रत्येक गावात वाघ यांना मताधिक्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मोदी आणि भाजप विरुद्ध लाट असतानाही भाजपच्या स्मिता वाघ यांनी जळगाव लोकसभा मतदार संघातील प्रत्येक विधानसभा मतदार संघातून आघाडी घेतली हे विशेष.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४north maharashtra regionउत्तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूकamalner-acअमळनेरMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी