शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

कैलास पाटील कसे निसटले? गुजरात चेकपोस्ट, पाऊस, मोटरसायकल, ट्रक; सांगितला रात्रीचा थरार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 2:45 PM

Kailas Patil Exclusive: शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला. 

आम्हाला ठाण्यात महापौरांच्या बंगल्यावर नेण्यात आले. तिथून आम्हाला साहेब पुढे आहेत, तिकडे आपल्याला जायचे आहे, असे सांगितले. स्टाफ आमच्यासोबत होता. आम्हाला दुसऱ्या गाडीत बसविण्यात आले. पुढे निघालो, वसई-विरार मला ते भाग माहिती नाहीत, शहरे संपू लागली आणि माझ्या मनात पाल चुकचुकली. काहीतरी वेगळे घडतेय अशी शंका आली, अशा शब्दांत शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी एकनाथ शिंदेंनी गुजरातला नेण्याच्या घटनेचा थरार सांगितला. 

तिथून पुढे एका हॉटेलवर थांबविण्यात आले. पुढे निघालो तेव्हा गुजरात बॉर्डरवर चेकपोस्ट लागले. ट्रॅफिक असल्याने आम्हाला शिंदे यांच्या स्टाफने चालत पुढे जाऊया असे सांगितले. गाडीतून बाहेर पडलो आणि मी तिथून निसटलो. अंधार होता, मुंबईच्या दिशेने चालू लागलो. बाईकवाल्याला मला मुंबईकडे जायचेय, तू जिथपर्यंत जातोयस तिथपर्यंत सोड,असे सांगितले. त्याने सोडले. पुढे एमपीचा ट्रक भेटला. चालकाला मी अडचणीत आहे, असे सांगितले. तो तयार झाला.  त्याने दहिसरपर्यंत सोडले. तोवर साहेबांशी संपर्क साधला होता, त्यांनी मला नेण्यासाठी गाडी पाठविली होती, असेही कैलास पाटील म्हणाले. 

मी मोटरसायकलवरून आल्याने भिजलो होतो, माझ्या मोबाईलची बॅटरीही सात टक्के राहिली होती. त्यामुळे मी कोणाला लोकेशन पाठविले नाही. उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला. साहेबांनी टोल नाक्यावर मला नेण्यासाठी गाडी पाठविली होती. तो माणूस तिथे आला. मी मुंबईत दाखल झालो, असे कैलास पाटील यांनी सांगितले. 

ज्या शिवसेनेने मला आमदार केले त्या शिवसेनेशी प्रतारणा करायचे मला पटले नाही. शिवसेनेविरोधात कटकारस्थान आखले गेले आहे. काही आमदार तिथे अडकले आहेत, असे कैलास पाटील म्हणाले. 

टॅग्स :Kailas Patilकैलास पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना